Wednesday, July 30, 2025
Homeक्राईमभुसावळ शहरात गोळ्या झाडून तरुणाची हत्या

भुसावळ शहरात गोळ्या झाडून तरुणाची हत्या

भुसावळ (प्रतिनिधी ) ;- भुसावळ शहरातील जाम मोहल्ला परिसरात आज एका 27 वर्षीय तरुणावर दुचाकीवरून आलेल्या चौघांनी बेछूट गोळीबार करून त्याचा निर्गुण खून केल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून जुन्या वादातून आखून झाल्याचे बोलले जात आहे. तेहरीन नासीर शेख (27, मचछीवाडा, जाम मोहल्ला, भुसावळ) असे मयत तरुणाचे नाव आहे.

सूत्रांनी दिलेली माहिती अशी की,सकाळी चहा पिण्यासाठी गेलेल्या तेहरीन नासीर शेख  याच्यावर जाम मोहल्ला भागातील  डीडी सुपर कोल्ड्रिंक्स आणि चहाच्या दुकानात  दोन दुचाकीवर तोंडाला रूमाल बांधून आलेल्या चौघांपैकी तिघांनी  गावठी पिस्तुलातून  गोळ्या झाडल्या. गोळीबाराचा आवाज ऐकून आजूबाजूच्या दुकानदारांमध्ये प्रचंड खळबळ उडून धावपळ उडाली.

शरीराच्या अनेक भागात गोळ्या लागल्यामुळे तेहरीनचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती कळताच पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, पोलीस निरीक्षक राहुल वाघ व सहकार्‍यांनी धाव घेतली. पोलिसांनी तपासचक्र वेगात फिरवली आहे.

 

ताज्या बातम्या