Saturday, October 4, 2025
HomeBlogभुसावळमध्ये १६ मोटारसायकलींची चोरी उघड; ८ लाखांचा मुद्देमाल जप्त

भुसावळमध्ये १६ मोटारसायकलींची चोरी उघड; ८ लाखांचा मुद्देमाल जप्त

भुसावळमध्ये १६ मोटारसायकलींची चोरी उघड; ८ लाखांचा मुद्देमाल जप्त

 

भुसावळ: भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी मोटारसायकल चोरीच्या एका गुन्ह्याचा तपास करताना तब्बल १६ मोटारसायकलींची चोरी उघडकीस आणली आहे. या कारवाईत पोलिसांनी ८ लाख ३२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असून, दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणाची सुरुवात अजहरुद्दीन नियाजुद्दीन शेख (वय ३८, रा. गोसिया नगर, भुसावळ) यांच्या तक्रारीवरून झाली. त्यांची हिरो एचएफ डिलक्स दुचाकी रेल्वे स्टेशन परिसरातून चोरीला गेली होती. त्यांनी २२ ऑगस्ट रोजी याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीचा वापर केला. त्या आधारे, पोलिसांनी काल्या उर्फ विक्रम केसरसिंग बारेला (वय २०, रा. गारग्या, जि. खरगोन, म.प्र.) याला शाहपूर (जि. बऱ्हाणपूर) येथून ताब्यात घेतले.

पोलिसांनी केलेल्या चौकशीत विक्रम बारेला याने त्याचा साथीदार राहुल रितेश चव्हाण (वय १८, रा. शाहपूर, जि. बऱ्हाणपूर, म.प्र.) याच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी या दोन्ही आरोपींकडून १६ मोटारसायकली चोरी केल्याचे कबूल करवून घेतले. त्यानंतर पोलिसांनी पंचनाम्याद्वारे सर्व दुचाकी जप्त करून एकूण ८ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या पथकाने केली. या पथकात पोलीस हवालदार विजय नेरकर, पोलीस नाईक सोपान पाटील आणि इतर कर्मचारी योगेश माळी, भुषण चौधरी, प्रशांत सोनार, महेंद्रसिंग पाटील, अमर अढाळे, किरण धनगर, रवींद्र भावसार, सचिन चौधरी, जावेद शहा, हर्षल महाजन आणि योगेश महाजन यांचा समावेश होता.

ताज्या बातम्या