Sunday, August 3, 2025
Homeक्राईमभडगावात अवैध वाळू वाहतूक करणारे तीन डंपर जप्त

भडगावात अवैध वाळू वाहतूक करणारे तीन डंपर जप्त

भडगावात अवैध वाळू वाहतूक करणारे तीन डंपर जप्त

भडगाव -प्रतिनिधी

भडगाव तालुक्यासह शहरातील गिरणा नदी पात्रातून सध्या अवैध वाळू वाहतूक सुरुच आहे. दरम्यान, आज सकाळी नालबंदी ते पळासखेडा गावादरम्यान तीन १० टायर असलेले वाळू भरलेले डंपर पकडून ते डंपर पोलीस ठाण्यात जमा केले आहेत. या अवैध वाळूचे तीनही डंपर पोलिसांनी महसूल विभागाकडे वर्ग केले आहेत.

तालुक्यात व शहरात सध्या गिरणा नदी पात्रातील अवैध वाळू वाहतूक हा संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे. यावर सतत कारवाई करून ही वाळूमाफिया हे गिरणा नदी पात्रातून अवैध वाळू उत्खनन सुरूच ठेवत आहेत. यावर आज सकाळी चाळीसगावचे डीवायएसपी यांच्या पथकातील संभाजी पाटील, रवींद्र पाटील, ज्ञानेश्वर बडगुजर, प्रकाश महाजन यांनी सकाळी ६ वाजता नालबंदी ते पळासखेडा गावादरम्यान तीन वाळूने भरलेले डंपर पकडून ते डंपर पोलीस स्टेशनमध्ये जमा केले आहेत. या अवैध वाळूचे तीनही डंपर पोलिसांनी महसूल विभागाकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. भडगाव तालुक्यासह शहरात गिरणा नदी पात्रातून दररोज ५० ते ६० डंपर व शेकडो ट्रॅक्टर हे अवैध वाळू वाहतूक करतात. यावर गेल्या दोन महिन्यांपासून भडगाव महसूल विभागाने कारवाईचा

बडगा उगारलेला आहे व तो बडगा कायम सुरूच राहणार आहे. यातच आज सकाळी चाळीसगाव विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेश चंदेल यांच्या पथकाने नालबंदी ते पळासखेडा गावाच्या दरम्यान या तीनही डंपरवर कारवाई केली. अवैध वाळू वाहतुकीचे हे डंपर पोलीस स्टेशनमध्ये जप्त करण्यात आले असून ते पुढील कारवाईसाठी भडगाव महसूल विभागाकडे वर्ग करण्यात आल्याचे सांगण्यात आले,

ताज्या बातम्या