Friday, August 1, 2025
Homeक्राईमबेपत्ता झालेल्या शेतकऱ्याचा विहिरीत मृतदेह आढळला

बेपत्ता झालेल्या शेतकऱ्याचा विहिरीत मृतदेह आढळला

पाळधी, ता. धरणगाव :-गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता झालेल्या शेतकऱ्याचा ग्रामपंचायतच्या विहिरीत मृतदेह आढळून आल्याची घटना पाच रोजी उघडकीस आली असून या शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.अशोक अमृत लंके (वय ४२) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अशोक लंके हे घरात कोणालाही न सांगता गेल्या दोन दिवसापासून बेपत्ता झाल्याने त्यांचे वडील अमृत लंके यांनी पाच रोजी पारधी पोलिसात हरवल्याची तक्रार दाखल केले होते. मात्र मात्र ग्रामपंचायतच्या पाणीपुरवठा करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला दुपारी तीन वाजेच्या सुमारास अशोक लंके यांचा मृतदेह विहिरीत आढळून आला. या ठिकाणी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.

दरम्यान अशोक लंके यांच्यावर कर्ज असल्याने त्यांनी या विवंचनेतून जीवन संपवल्याची चर्चा होत आहे.

ताज्या बातम्या