Saturday, October 4, 2025
Homeक्राईमपारोळ्यात बनावट देशी दारूच्या कारखान्यावर धाड ; 40 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

पारोळ्यात बनावट देशी दारूच्या कारखान्यावर धाड ; 40 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

पारोळ्यात बनावट देशी दारूच्या कारखान्यावर धाड ; 40 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

तीन जणांना अटक ; पारोळा पोलिसांची कारवाई

जळगाव : पारोळा तालुक्यातील बहादरपूर शिवारात बोरी नदीच्या काठावर गुपचूप सुरू असलेल्या मोठ्या बनावट देशी दारूच्या कारखान्यावर पोलिसांनी थरारक धाड टाकत लाखोंचा मुद्देमाल जप्त केला. तब्बल ४० लाख ३३ हजारांचा मुद्देमाल जप्त करत पोलिसांनी दारूबंदी कायद्याला चुकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या रॅकेटचा भांडाफोड केला. या कारवाईत तिघांना गजाआड करण्यात आले आहे.

ही कारवाई पारोळा पोलिसांनी पोलीस निरीक्षक सचिन सानप यांच्या नेतृत्वाखाली केली. त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीनंतर पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी आणि अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर-पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजनबद्ध पद्धतीने छापा टाकण्यात आला. ‘टँगो पंच’ या नावाने बनावट दारूची निर्मिती व पॅकिंग सुरू होते, असे उघड झाले.

कारवाईत जप्त मुद्देमालात समावेश :

तयार देशी दारूचे शेकडो बॉक्स व बाटल्या

स्पिरिट व विविध रसायनांचा साठा

पॅकिंग व सीलिंगसाठी लागणारी हाय-टेक मशिनरी

बोलेरो आणि स्विफ्ट डिझायर या दोन मालवाहू गाड्या

हजारो रिकाम्या बाटल्या, बूच व पॅकेजिंग साहित्य

या प्रकरणी राकेश जैन, टिंन्या डोंगऱ्या पावरा आणि कतारसिंग पावरा या तिघांना अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

ताज्या बातम्या