मुंबई वृत्तसंस्था : नायलॉन मांजामुळे राज्याच्या काही भागांत नागरिक जखमी झाल्याच्या, मृत्युमुखी पडल्याच्या घटना घडल्या असल्याने या मांजाच्या उत्पादनावर बंदी आणण्याबरोबरच त्याच्या विक्रीवर सक्त कारवाई करावी, असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांनी शुक्रवारी प्रशासनाला दिले. अशा मांजाचा उपयोग टाळण्यासाठी जनजागृती करावी, अशा सूचनाही दिल्या.
मुंबई, ठाणे, नाशिक, जळगाव, धुळे, पुणे, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका क्षेत्रातील नायलॉन मांजा
उपयोगावरील प्रतिबंधात्मक कारवाईबाबत गोहे यांनी शुक्रवारी ऑनलाइन बैठक घेतली.
पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव विनीता सिंघल, मुंबई मनपा आयुक्त भूषण गगराणी, पोलीस उपायुक्त (उपक्रम) पठाण, छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्त प्रवीण पवार, ठाणे पोलीस आयुक्त प्रशांत परबकर, नाशिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, धुळे अतिरिक्त पोलीस अधीक्षक किशोर काळे, पुणे सहपोलीस आयुक्त रंजन कुमार, जळगावचे ऑफर पोलीस अधीक्षक अशोक नखाते या बैठकीला ऑनलाइन उपस्थित होते,