चोपडा प्रतिनिधी I नवा मोबाईल घेऊन परतणाऱ्या वर्डी येथील दोन सख्ख्या भावांचा अपघातात मृत्यू झाला आहे. टेमरया उर्फ रगन जगन बारेला (वय १८) आणि मगन जगन बारेला (वय ३०) अशी त्यांची नावे आहेत.
चोपडा येथून दुचाकीने (एमएच १९, एव्ही ८५८२) घरी परत येत असताना, माचला फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीला एका भरधाव वेगातील क्रेटा कारने (एमएच ०४, एचएफ ८२९६) धडक दिली.
या अपघातात मगन बारेला यांचा जागीच मृत्यू झाला, तर टेमरया बारेला यांचा उपचारादरम्यान चोपडा उपजिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे. पुढील कारवाई अडावद पोलीस करत आहेत.