दुचाकीच्या चाकात साडी अडकल्याने अपघातामध्ये पहूर येथील महिलेचा मृत्यू
सिल्लोड येथील दुर्दैवी घटना
पहूर, ता. जामनेर प्रतिनिधी कामानिमित्त सिल्लोड येथे दुचाकीने मुलासोबत जाणाऱ्या पहूर येथे राहणाऱ्या 48 वर्षीय महिलेचा पदर चाकात अडकून झालेल्या अपघातात महिलेच्या डोक्याला जबर मार लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना 30 रोजी दुपारी घडली. यामुळे पहूर परिसरात व्यक्त होत आहे.
मनीषा कैलास चौधरी असे मयत महिलेचे नाव आहे. मनीषा चौधरी या त्यांचा मुलगा ऋषी चौधरी याच्यासोबत छत्रपती संभाजी नगर मधील सिल्लोड येथे प्लॉटच्या कामानिमित्त दुचाकी ने जात असताना अचानक त्यांची साडी दुचाकीच्या चाकात अडकून झालेल्या अपघातामध्ये त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. त्यांना उपचारासाठी सिल्लोडच्या रुग्णालयात दाखल केले असता अतिरक्तस्त्राव झाल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान मनीषा चौधरी या पहूर येथील जळगाव मार्गावर वास्तव्याला होत्या. त्यांच्या या अचानक झालेल्या मृत्यूमुळे परिसरात व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पती दोन मुले सून नातू असा परिवार आहे.