Saturday, October 4, 2025
Homeखानदेशजैन स्पोर्टस् अकॅडमी आणि  तायक्वांडोचा राष्ट्रीय खेळाडू पुष्पक  महाजन गुणवंत खेळाडू पुरस्काराने...

जैन स्पोर्टस् अकॅडमी आणि  तायक्वांडोचा राष्ट्रीय खेळाडू पुष्पक  महाजन गुणवंत खेळाडू पुरस्काराने सन्मानित

जैन स्पोर्टस् अकॅडमी आणि  तायक्वांडोचा राष्ट्रीय खेळाडू पुष्पक  महाजन गुणवंत खेळाडू पुरस्काराने सन्मानित

जळगांव प्रतिनिधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगांव, यांच्या वतीने क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना गुणवंत खेळाडू”पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

यावर्षीच्या पुरस्कारांमध्ये जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन तथा जैन स्पोर्टस् अकॅडमी चा खेळाडू पुष्पक रमेश महाजन याला तायक्वांडो या क्रीडा प्रकारात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सन २०२४-२५ चा “गुणवंत खेळाडू पुरस्काराने  जिल्हयाचे पालकमंत्री  गुलाबराव पाटील यांच्या हस्ते गौरवचिन्ह देऊन गौरविण्यात आले,

यावेळी  जिल्हाधिकारी  आयुष प्रसाद, जिल्हा पोलिस अधीक्षक  महेश्वर रेड्डी, तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी  रविंद्र नाईक  उपस्थित होते.

पुष्पक ला मिळालेल्या पुरस्कारांबद्दल संघटनेचे अध्यक्ष श्री अतुल जैन, उपाध्यक्ष  ललीत पाटील, महासचिव  अजित घारगे, कोषाध्यक्ष  सुरेश खैरनार, सहसचिव  रविंद्र धर्माधिकारी, सदस्य  सौरभ चौबे,  महेश घारगे, श्री नरेंद्र महाजन,  कृष्णकुमार तायडे तसेच जैन स्पोर्टस् अकॅडमी चे अरविंद देशपांडे, जयेश बाविस्कर यांनी अभिनंदन केले,

ताज्या बातम्या