Monday, August 24, 2026
HomeBlogजळगाव जिल्हा पोलीस दलाला मिळाले ८ मोबाईल फॉरेन्सिक वाहन

जळगाव जिल्हा पोलीस दलाला मिळाले ८ मोबाईल फॉरेन्सिक वाहन

जळगाव जिल्हा पोलीस दलाला मिळाले ८ मोबाईल फॉरेन्सिक वाहन

विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याहस्ते उदघाटन

जळगाव प्रतिनिधी मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, यांच्या हस्ते सदरच्या मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन लोकार्पण सोहळादि.२७/०१/२००५ रोजी  सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे पार पडला होता. त्यावेळी जळगाव जिल्हा पोलीस दलाला ८ मोबाईल फॉरेन्सिक वाहने देण्यात आलेली होती.

आज दिनांक 30 रोजी  परीक्षेत्राचे विशेष पोलीस निरीक्षक  दत्तात्रय कराळे हे जळगाव जिल्हा पोलीस दलाचो वार्षिक निरीक्षण करीता आले असता त्यांनी पोलीस मुख्यालयातील परेड ग्राउंडवर सदरची ०८ मोबाईल फॉरेन्सिक वाहनांना हिरवा झेंडा दाखवुन सदर वाहने जिल्हा पोलीस दलात समाविष्ठ करण्यात आली. त्यावेळी त्यांनी सांगितले की, गंभीर गुन्हा तपासण्यासाठी विशेषत सात किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा असलेल्या गुन्ह्यांमध्ये न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा तज्ञ शांकडून घटनांस्थळावर त्वरित भेट देवुन फॉरेन्सिक सहाय्य पुरविण्यासाठी, परिस्थितीजन्य पुरावे गोळा करणे, व विश्लेषण करणेसाठी मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन ह्या न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय गृहविभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई अंतर्गत, जळगाव जिल्हा पोलीस घटकातील आठ उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयांकरीता उपलब्ध होणार आहे. सदर व्हॅन सोबत आवश्यक प्रशिक्षीत मनुष्यबळ, फॉरेन्सिक किट, रसायने, सॉफ्टवेअर पुरविण्यात येणार आहे. सदर मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन अंतर्गत क्राईम सीन अॅप्लिकेशन जे ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करुन गुन्हेस्थळ तपासणी पुरावा संग्रहित करुन बारकोड द्वारे सुरक्षित करण्यात येणार आहे.

सदर कार्यक्रम नाशिक परीक्षेत्राचे विशेष पोलीस निरीक्षक मा.श्री दत्तात्रय कराळे, मा.डॉ.श्री महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक सो जळगाव, मा.श्री अशोक नखाते, अपर पोलीस अधीक्षक, जळगाव, मा.श्रीमती कविता नेरकर, अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव, जिल्हयातील सर्व उप विभागीय पोलीस अधिकारी, पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी यांचे उपस्थितीत पार पडला

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या