जळगावात उद्यापासून तीन दिवस मुसळधार पाऊस होण्याची शक्यता
जळगाव | जिल्ह्यात पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याच्या परिस्थितीत, दोन दिवसांपूर्वी पाचोरा, भडगाव आणि एरंडोल तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस झाल्याने नद्यांना पूर आला होता. आता बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, ते उत्तर-पूर्व भागातून सक्रिय होऊन पश्चिमेकडे सरकले आहे आणि मध्य महाराष्ट्रात पावसाला चालना देण्याची शक्यता आहे.
हवामान तज्ज्ञ नीलेश गोरे यांच्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यात २४ सप्टेंबरपासून नवीन पावसाची प्रणाली तयार होईल. या प्रणालीमुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण होईल आणि पुढील तीन दिवस म्हणजे २५ ते २८ सप्टेंबर दरम्यान जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. जळगाव शहर व परिसरातील नागरिकांनी सतर्क राहावे, तसेच नदीकाठच्या भागात राहणाऱ्यांनी सुरक्षितता उपाययोजना कराव्यात.