Sunday, October 5, 2025
Homeक्राईमगांजाचे सेवन करताना एकाला पकडले

गांजाचे सेवन करताना एकाला पकडले

गांजाचे सेवन करताना एकाला पकडले

जळगाव प्रतिनिधी
शिवाजीनगर उड्डाण पुलाच्या पुढे एक जण गांजा या अमली पदार्थाचे सेवन करताना आढळून आल्याने त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे, ही कारवाई तालुक्यातील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली,. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की मनोहर प्रकाश भोसले वय 30 हा अमली पदार्थाचे सेवन करताना 28 जानेवारी रोजी आढळून आला.

त्याच्याविरुद्ध जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे, ही कारवाई पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील श्री पोटे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी ,संजय हिवरकर, राजेश मेढे ,विजय पाटील आणि हेडकॉन्स्टेबल हरिलाल पाटील यांच्या पथकाने केली.

ताज्या बातम्या