Saturday, October 4, 2025
Homeभुसावळखेळ हा विद्यार्थी जीवनातील महत्वाचा भाग - जे.पी. सपकाळे

खेळ हा विद्यार्थी जीवनातील महत्वाचा भाग – जे.पी. सपकाळे

खेळ हा विद्यार्थी जीवनातील महत्वाचा भाग – जे.पी. सपकाळे

शालेय तालुका क्रिकेट स्पर्धा उत्साहात

भुसावळ -महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव व पंचायत समिती शिक्षण विभाग भुसावळ व बियाणी एज्युकेशन ट्रस्ट च्या संयुक्त विद्यमाने बियाणी मिलिटरी स्कूल भुसावळ येथे १४,१७,१९ वर्षातील तालुका स्तरीय क्रिकेट स्पर्धां उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न झाल्या. सदर स्पर्धेचे उद्घाटन भुसावळ तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष जे.पी. सपकाळे यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बियाणे एज्युकेशन ट्रस्टच्या सचिव डॉ. संगीता बियाणी या होत्या .प्रमुख अतिथी शाळेचे प्राचार्य डी. एम. पाटील, महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष तालुका समन्वयक डॉ.प्रदीप साखरे, वंदना ठोके, यांच्यासह क्रीडा शिक्षक प्रशिक्षक, खेळाडू, पंच मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रथम उद्घाटक जे. पी. सपकाळे व कार्यक्रमाचे अध्यक्षा यांच्या हस्ते प्रमुख अतिथींच्या उपस्थितीत क्रीडांगण पूजन करून उद्घाटन करण्यात आले.,

प्रास्ताविक डॉ प्रदीप साखरे यांनी केले., स्पर्धेचे उद्घाटक जे. पी. सपकाळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना खेळाडूंचे सर्व स्पर्धेत सहभागी होता म्हणून मनःपूर्वक अभिनंदन केले. विद्यार्थी जीवनात खेळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे खेळ हा विद्यार्थ्यांच्या जीवनातील निराशा नाहीसा करणार आहे व विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवणारा आहे.

त्यामुळे विद्यार्थी जीवनात प्रत्येकाने खेळ खेळले पाहिजे जे संघ तालुक्यावरती विजयी होतील त्यांना माझ्या शुभेच्छा आहे परंतु त्यांनी जिल्हास्तर आणि राज्यस्तरावरती सुद्धा विजय संपादन करून आपल्या तालुक्याचे नाव पुढे न्यावं अशा शुभेच्छा दिल्या.

अध्यक्षा डॉ.संगीता बियाणी यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करताना सांगितले खेळाडू वृत्तीने खेळून आपल्या खेळाचे प्रदर्शन करावे व जयपराचे आपण पचवावा, आपले शिक्षक आपल्याला क्रीडांगांपर्यंत आणून स्पर्धेच्या संधी उपलब्ध करून देतात त्याचा फायदा प्रत्येक विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे असे मार्गदर्शन केले.

तसेच खेळाडूंना शुभेच्छा दिल्या सर्व गटातील मुलांचे २२संघ/३३० खेळाडूंनी भाग नोंदविला यात 19 वर्षातील मुलांमध्ये बियाणी जुनिअर कॉलेज चा संघ विजयी होऊन प्रथम स्थानी राहिला. बी. झेड. उर्दू , तर सतरा वर्षातील गटात अंतिम सामना बियाणी मिलिटरी स्कूल व डॉ.उल्हास पाटील इंग्लिश स्कूल यांच्या झाला. यात डॉक्टर उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल संघ विजयी होऊन प्रथम स्थानी राहिला. तर बियाणी मिलिटरी स्कूल द्वितीय स्थानी राहिला, ताप्ती स्कूल च्या संघाला तृतीय स्थानी समाधान मानावे लागले.

सतरा वर्षातील मुलींमध्ये अहिल्यादेवी कन्या विद्यालय विजय ठरले.14वर्षा आतील मुलांमध्ये बियाणी पब्लिक स्कूल मिरगव्हाण विजयी होऊन प्रथम स्थानी राहिले तर डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल उपविजेता ठरुन द्वितीय स्थानी राहिले. तर ताप्ती स्कूल ला तृतीय स्थानावर समाधान मानावे लागले. पंच म्हणून डॉ प्रदीप साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली, व्ही. एस. पाटील, मुकेश मोरे,हिम्मत पाटील,अर्जुन सनन्स,अझर शेख,तोशिब कुरेशी, विनय काळे, यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वीतेसाठी पी.आर. साखरे, डी.एम. पाटील पाटील,यांच्यासह सर्व क्रीडा शिक्षक व बियाणी स्कूलचे कर्मचारी व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्र बद्ध सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मुकेश मोरे यांनी केले.

ताज्या बातम्या