राष्ट्रपतींकडून मनू भाकरसह चौघांना ‘खेलरत्न’ प्रदान
नवी दिल्ली Í वृत्तसंस्था
राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी शुक्रवारी 17 जानेवारी रोजी क्रीडा क्षेत्रातील विविध दिग्गज खेळाडूंचा विशेष समारंभामध्ये सत्कार करूनमनू भाकर-डी गुकेश यांच्यासह चार जणांना खेलरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.
मनू-गुकेश व्यतिरिक्त, भारतीय पुरुष हॉकी संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि पॅरा-ॲथलीट प्रवीण कुमार यांनाही क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल समान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
याशिवाय राष्ट्रपतींनी 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले. राष्ट्रपती मुर्मू यांनी अर्जुन पुरस्कार (आजीवन), राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन, द्रोणाचार्य पुरस्कार (नियमित आणि लाइटटाइम श्रेणी) आणि मौलाना अबुल कलाम आझाद (MAKA) ट्रॉफी विजेत्यांनाही सन्मानित केले.
ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार
डी गुकेश (बुद्धिबळ) हरमनप्रीत सिंग (हॉकी)प्रवीण कुमार (पॅरा ॲथलेटिक्स) मनू भाकर (शूटिंग
अर्जुन पुरस्कार यादी
ज्योती याराजी (ॲथलेटिक्स)अन्नू राणी (ॲथलेटिक्स)नीतू (बॉक्सिंग) स्वीटी (बॉक्सिंग) वंतिका अग्रवाल (बुद्धिबळ)सलीमा टेटे (हॉकी)अभिषेक (हॉकी)संजय (हॉकी)जर्मनप्रीत सिंग (हॉकी)सुखजित सिंग (हॉकी)राकेश कुमार (पॅरा तिरंदाजी) प्रीती पाल (पॅरा ॲथलेटिक्स)जीवनजी दीप्ती (पॅरा ॲथलेटिक्स)अजित सिंग (पॅरा ॲथलेटिक्स)सचिन सर्जेराव खिलारी (पॅरा ॲथलेटिक्स)धरमबीर (पॅरा ॲथलेटिक्स) प्रणव सुरमा (पॅरा ॲथलेटिक्स)एच होकातो सेमा (पॅरा ॲथलेटिक्स)सिमरन जी (पॅरा ॲथलेटिक्स) नवदीप (पॅरा ॲथलेटिक्स)नितीश कुमार (पॅरा बॅडमिंटन)तुलसीमाथी मुरुगेसन (पॅरा बॅडमिंटन)नित्य श्री सुमती सिवन (पॅरा बॅडमिंटन)मनीषा रामदास (पॅरा बॅडमिंटन)कपिल परमार (पॅरा ज्युदो) मोना अग्रवाल (पॅरा नेमबाजी)रुबिना फ्रान्सिस (पॅरा नेमबाजी) स्वप्नील सुरेश कुसळे (शूटिंग)सरबज्योत सिंग (शूटिंग)अभय सिंग (स्क्वॉश)साजन प्रकाश (पोहणे)अमन (कुस्ती)
क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कार (आजीवन)
सुचा सिंग (ॲथलेटिक्स)मुरलीकांत राजाराम पेटकर (पॅरा-स्विमिंग
द्रोणाचार्य पुरस्कार (नियमित श्रेणी)
सुभाष राणा (पॅरा-शूटिंग)दीपाली देशपांडे (शूटिंग)संदीप सांगवान (हॉकी)
द्रोणाचार्य पुरस्कार (आजीवन श्रेणी)
1. एस. मुरलीधरन (बॅडमिंटन)
2. अरमांडो ऍग्नेलो कोलाको (फुटबॉल)
राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार
फिजिकल एज्युकेशन फाउंडेशन ऑफ इंडिया
मौलाना अबुल कलाम आझाद (MAKA) ट्रॉफी 2024चंदिगड विद्यापीठ (एकूणच विजेते विद्यापीठ)लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, (प्रथम उपविजेते विद्यापीठ)गुरु नानक देव विद्यापीठ, अमृतसर (द्वितीय रनर अप विद्यापीठ)