Wednesday, July 30, 2025
Homeक्राईमखिडकीचे गज कापून चोरट्याने सात लाखांचा मुद्देमाल लांबविला

खिडकीचे गज कापून चोरट्याने सात लाखांचा मुद्देमाल लांबविला

भुसावळ  :- शहरातील जामनेर रोडवरील सोमनाथ नगर, शिवशक्ती कॉलनी भागातील बंद घराच्या खिडकीचे गज कापून घरातील सात लाख रुपयांची रोकड व सोन्या चांदीचे दागिने असा मुद्देमाल लांबविल्याची  उघडकीस आले असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील लोखंडे वाडा, शिवशक्ती कॉलनीजवळील सोमनाथ नगरात इलेक्ट्रीशियन किचन असलेले अनिल हरी बन्हाटे हे त्यांची पत्नी तथा सेवानिवृत शिक्षिका यांच्यासोबत सुमारे १० वर्षापासून वास्तव्यास आहेत.  दरम्यान, २ रोजी दुपारी २ ते रात्री १० वाजेदरम्यान अज्ञात चोरट्‌यांने अनिल बन्हाटे यांच्या घरात बेडरूमच्या खिडकीचे गज कापून प्रवेश केला. त्यानंतर सोन्याचे दागिने व रोकड असा एकूण ७ लाख २ हजारांचा ऐवज लंपास केला.

घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, पोलीस निरीक्षक राहूल वाघ व सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत माहिती जाणून घेतली.  या प्रकरणी अनिल बन्हार्ट यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाजारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक

 

 

ताज्या बातम्या