काळ्या बिकिनीत आलिया सनबाथ घेताना दिसली !
कुटुंबासोबत नवीन वर्ष २०२५ सेलिब्रेशनचे फोटो शेअर
नवी दिल्ली वृत्तसंस्था
आलिया भट्टने पुन्हा एकदा तिचा व्हेकेशनचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे, जिथे ती बीचवर आराम करताना दिसत आहे. तिने सोशल मीडियावर एक मोहक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती बीचवर आराम करताना दिसत आहे. आलियाने अलीकडेच काळ्या रंगाचा बिकिनी फोटो शेअर करून सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते, आता तिने पुन्हा एकदा तिच्या कुटुंबासोबत नवीन वर्ष २०२५ सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत, यावर्षी तिने थायलंडमध्ये आपले नवीन वर्ष साजरे केले. अभिनेत्री सतत सुट्टीतील फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. ती बीचवर सनबाथ करताना दिसत आहे.
आलियाने अलीकडेच सुट्टीतील आणखी काही फोटो पोस्ट केले होते. फोटोंमध्ये ती पाण्याखाली मस्ती करताना दिसत होती. आलिया तिची बहीण शाहीनसोबत मस्ती करताना आणि मोकळ्या वेळेत वर्कआऊट करताना कॅमेऱ्यात कैद झाली. कुटुंबासह थायलंडला सुट्टी घालवण्यासाठी आलेली ही अभिनेत्री पती रणवीर कपूर, मुलगी राहा कपूर, सासू नीतू कपूर, आई सोनी राजदान, बहीण शाहीन भट्ट आणि ननंद रिद्धिमा यांच्यासोबत दिसली. आलिया लवकरच अॅक्शन-पॅक्ड स्पाय-ड्रामा ‘अल्फा’मध्ये दिसणार आहे. शिव रवैल दिग्दर्शित चित्रपटात तिच्यासोबत शर्वरी वाघ आणि आयनार हॅराल्डसन यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत.