Sunday, August 3, 2025
Homeक्राईमकार घेण्यासाठी विवाहितेचा पाच लाखासाठी छळ

कार घेण्यासाठी विवाहितेचा पाच लाखासाठी छळ

कार घेण्यासाठी विवाहितेचा पाच लाखासाठी छळ

सासरच्या मंडळींविरुद्ध यावल पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा

यावल प्रतिनिधी माहेरहून कार घेण्यासाठी पाच लाख रुपये आणावेत या मागणीसाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी सासरच्या मंडळी विरुद्ध यावल पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यावल तालुक्यातील दहिगाव येथे माहेर असणाऱ्या शलाका सुयोग जैन वय 29 या विवाहितेचा विवाह पारोळा येथील रहिवासी असलेल्या सुयोग रवींद्र जैन यांच्यासोबत झाला होता, मात्र पती सुयोग जैन सासरे रवींद्र जैन, सासू पुष्पा जैन तिघे राहणार बालाजी मंदिराजवळ पारोळा तर नंदोइ रोशन लक्षण जैन ननंद श्रद्धा रोशन जैन दोन्ही राहणार धुळे व नंदोई धीरज किरणलाल जैन राहणार नाशिक या सात जणांनी माहेर मधून पाच लाख रुपये कार घेण्यासाठी आणावेत या मागणीसाठी छळ केल्याप्रकरणी यावर पोलीस स्टेशनला शलाका जैन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे

ताज्या बातम्या