कवयित्री बहिणाबाई महिला व सरदार वल्लभभाई पटेल बॉक्स क्रिकेट लीग उत्साहात संपन्न
महिलांमधून रॉयल रेंजर्स तर पुरुषांचा गोदावरी ड्रीप संघ विजयी
जळगाव – लेवा पाटीदार प्रीमिअर लीग आयोजित कवयित्री बहिणाबाई महिला बॉक्स क्रिकेट लीग, भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल पुरुष बॉक्स क्रिकेट लीग चे २८ ते ३० मार्च २०२५ या कालावधीत उत्साहात संपन्न झाली. रविवारी सायंकाळी पारितोषिक वितरणाच्या स्पर्धेचा समारोप झाला.
पहिल्यांदाच महिलांसाठी या प्रकारची बॉक्स क्रिकेट लीग आयोजित करण्यात आल्याने तिन्ही दिवस महिलांनी उत्कृष्ट रित्या खेळून आनंद लुटला. रविवार, दिनांक ३० मार्च रोजी रात्री या सर्व बॉक्स क्रिकेट स्पर्धेचा समारोप झाला. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून माजी महापौर सीमा ताई भोळे, महादेव हॉस्पिटल च्या संचालिका डॉ केतकी ताई पाटील, माधुरी अत्तरदे, गायत्री राणे, पूजा महाजन, शर्वरी काळे, सूचिता चौधरी, गायत्री महाजन, डॉ पंकज पाटील, डॉ जितेंद्र चौधरी, हिमांशू इंगळे, चंदन कोल्हे, योगेश खडके, पियुष कोल्हे हे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघाना पारितोषिके वितरित करण्यात आली. यात सरदार वल्लभभाई पटेल बॉक्स क्रिकेटमध्ये गोदावरी ड्रीप संघ विजेता ठरला असून आर जे ट्रेडर्स संघ उपविजेता ठरला. कवयित्री बहिणाबाई महिला बॉक्स क्रिकेट लिगमधून रॉयल रेंजर्स संघ विजेता तर स्पेस ९ क्रियेटर्स संघ उपविजेता ठरला. विजयी संघाना ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.
यांचे लाभले सहकार्य
या स्पर्धेसाठी गोदावरी फाऊंडेशन संचालित महादेव हॉस्पिटलच्या संचालिका डॉ केतकी ताई पाटील, आमदार राजूमामा भोळे, माजी महापौर ललित कोल्हे, एस व्ही पी एल सोलर चे संचालक हिमांशू इंगळे, डॉ पंकज पाटील, डॉ मनीष चौधरी, डॉ जितेंद्र ढाके, महेश चौधरी, दीपक पाटील, चेतन पाटील, दीप्ती ढाके, जयेश नारखेडे, डॉ वैभव पाटील, सोहम खडके, भूषण चौधरी, गौतम चौधरी, डॉ गौरव महाजन, निलेश चौधरी, हरीश कोल्हे, आशुतोष पाटील, तेजस रडे, योगेश खडके, जयेश भंगाळे, माधुरी अत्तरदे, सूचिता चौधरी, प्रीती महाजन, राधा कोल्हे, गायत्री राणे, पल्लवी चौधरी, पूजा महाजन, शर्वरी काळे, गायत्री महाजन, पूजा सरोदे, अमित भंगाळे आदींचे सहकार्य लाभले.