Saturday, August 2, 2025
Homeक्राईमकर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून संपवले जीवन 

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून संपवले जीवन 

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून संपवले जीवन 

धरणगाव तालुक्यातील चमगाव येथील घटना

जळगाव प्रतिनिधी 

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने शेतामध्ये असलेले विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याचा प्रयत्न केल्याची घटना धरणगाव तालुक्यातील चमगाव येथे घडली होती .मात्र या 45 वर्षे शेतकऱ्याचा जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

कर्जाला कंटाळून राजेश्वर आनंदा सावंत (वय ४५) असे मयत शेतकऱ्याचे नाव असून याबाबत धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

धरणगाव तालुक्यातील चमगाव येथे राजेश्वर सावंत हे

गेल्या काही वर्षापासून त्यांनी शेती करण्यासाठी कर्ज काढले होते. पण सततची नापिकी आणि कर्जबाजाराला कंटाळून त्यांनी सोमवार दि. २७ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता शेतात असताना विषारी औषध घेतले. त्यांचे प्रकृती खालावल्याने त्यांना त्यांच्या नातेवाईकांनी तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना गुरुवार दि. ३० जानेवारी रोजी पहाटे ५ वाजता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात आई, कमलाबाई पत्नी आशाबाई आणि सागर, विशाल ही दोन मुले असा परिवार आहे.

ताज्या बातम्या