Saturday, October 4, 2025
Homeताज्या बातम्याकरूरमध्ये सुपरस्टार विजयच्या सभेत भीषण चेंगराचेंगरी; ३८ मृत, शेकडो जखमी

करूरमध्ये सुपरस्टार विजयच्या सभेत भीषण चेंगराचेंगरी; ३८ मृत, शेकडो जखमी

करूरमध्ये विजयच्या सभेत भीषण चेंगराचेंगरी; ३८ मृत, शेकडो जखमी

करूर (वृत्तसंस्था) । तामिळ सुपरस्टार व नवोदित राजकीय नेते विजय यांच्या शनिवारी संध्याकाळी करूर येथे झालेल्या विराट सभेत भीषण दुर्घटना घडली. सभेला उसळलेल्या प्रचंड गर्दीत नियंत्रण सुटल्याने चेंगराचेंगरी झाली असून तब्बल ३८ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये आठ बालकांचा समावेश आहे.

या घटनेत १०० हून अधिक जण जखमी झाले असून त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

२०२६ च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विजयने अलीकडेच स्वतःचा पक्ष स्थापन केला असून, या पक्षाला तामिळनाडूत प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्याच अनुषंगाने करूर येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित राहिले होते. मात्र प्रचंड गर्दीमुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊन दुर्दैवी चेंगराचेंगरी घडली.

या घटनेमुळे संपूर्ण तामिळनाडूत हळहळ व्यक्त होत असून, सरकारकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

ताज्या बातम्या