Saturday, October 4, 2025
Homeक्राईमउपमुख्यमंत्री शिंदे यांच्या तोतया पीएला बेड्या

उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या तोतया पीएला बेड्या

उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या तोतया पीएला बेड्या

आर्थिक गुन्हे शाखेची ठाण्यात कारवाई; ३० ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी ; १८ जणांची फसवणूक
जळगाव तत्कालीन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा स्वीय सहायक असल्याचे भासवून हितेश रमेश संघवी (४९, रा. नवी मुंबई) याने १८ जणांची फसवणूक केली. नोकरी व फ्लॅट देण्याचे आमिष दाखवत तब्बल ५५ लाख ६० हजार रुपयांची रक्कम लाटल्याचे उघड झाले आहे.

८ ऑगस्टला गुन्हा दाखल
या प्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात ८ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल झाला होता. पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला.

ठाण्यातून अटक
गुप्त माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या पथकाने रविवारी रात्री ठाण्यातील एका घरातून संघवीला अटक केली.

३० ऑगस्टपर्यंत कोठडी
सोमवारी न्यायालयात हजर केल्यानंतर संघवीला ३० ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात इतर सहकार्‍यांचीही चौकशी सुरू आहे.

ताज्या बातम्या