Thursday, July 31, 2025
Homeजळगाव जिल्हाआठवडे बाजारातील चोरीला गेलेले ३३ मोबाईल पोलिसांनी शोधून केले मूळ मालकांना परत

आठवडे बाजारातील चोरीला गेलेले ३३ मोबाईल पोलिसांनी शोधून केले मूळ मालकांना परत

आठवडे बाजारातील चोरीला गेलेले ३३ मोबाईल पोलिसांनी शोधून केले मूळ मालकांना परत
एमआयडीसी पोलिसांची कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील आठवडे बाजारात खरेदीसाठी गेलेल्या नागरिकांचे मोबाईल चोरट्यांनी लंपास केले होते. मात्र, एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पथकाने चोख तपास करत ३३ मोबाईल हस्तगत केले असून ते त्यांच्या मूळ मालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलिसांनी तपासाच्या दरम्यान मोबाईलची माहिती तांत्रिक पद्धतीने शोधून काढली आणि मोबाईलचे मूळ धारक शोधून त्यांच्याशी संपर्क साधला. यानंतर संबंधित नागरिकांना पोलीस ठाण्यात बोलावून मोबाईल परत देण्यात आले.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.

मोबाईल शोधमोहीमेत पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके, पोलीस हेडकॉन्स्टेबल गणेश शिरसाळे, पोलीस नाईक प्रदीप चौधरी आणि पोलीस कॉन्स्टेबल निलेश पाटील यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोबाईल चोरीच्या घटना उघडकीस येत असून नागरिकांच्या मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी पोलिस यंत्रणा सतत सज्ज असल्याचा विश्वास या कारवाईतून पुन्हा एकदा दृढ झाला आहे.

ताज्या बातम्या