अमेरिकेत विमान आणि हेलिकॉप्टरची हवेत टक्कर : 18 प्रवाशांचा मृत्यू
वॉशिंग्टन डीसी वृत्तसंस्था
64 प्रवाशांना घेऊन जाणारे अमेरिकन एअरलाइन्स चे विमान आणि अमेरिकन लष्कराचे हेलिकॉप्टर यांच्यात हवेत टक्कर झाल्याची घटना वाशिंग्टन डीसी येथे घडली असून 18 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे,
एअरलाइन्सचं विमान हवेतच लष्कराच्या हेलिकॉप्टरला धडकून भीषण अपघात झालाय. विमानात ६४ प्रवासी होते अशी माहिती समोर येत आहे. व्हाइट हाउसपासून काही किलोमीटर अंतरावर घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडालीय.या दुर्घटनेत अनेक जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जातेय. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.वॉशिंग्टन डिसीमध्ये रीगन नॅशन एअरपोर्टजवळ ही दुर्घटना घडली. अमेरिकन एअरलाइन्सचं विमान हवेतच हेलिकॉप्टरला धडकलं. या धडकेनंतर विमान आणि हेलिकॉप्टर नदीत कोसळले. नदीतून दोन मृतदेह बाहेर काढले असून बचावकार्य सुरू आहे.
https://x.com/i/status/1884803201137770868
मिळालेल्या माहितीनुसार, लहान पॅसेंजर विमान ५४ प्रवाशांना घेऊन निघालं होतं. कॅन्सासहून वॉशिंग्टनच्या दिशेनं हे विमान आलं होतं. एअरलाइन कंपनीने माहिती देताना म्हटलं की, पीएसएकडून चालवलं जाणारं अमेरिकन ईगल फ्लाइट ५३४२ विमान कॅन्सासहून वॉशिंग्टन रीगन नॅशन एअरपोर्टला येत होते. त्यावेळी विमानाची हेलिकॉप्टरला धडक बसली.