अमेरिकेत भारतीय युवकाची गोळी झाडून हत्या
हैदराबाद : अमेरिकेत एका २६ वर्षीययु वकाची गोळी झाडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना सोमवारी समोर आली. के. रवि तेजा असे मृत युवकाचे नाव आहे.
मूळचा तेलंगणातील असलेला रवि २०२२ साली अमेरिकेत गेला होता. ८ महिन्यांपूर्वी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो नोकरी शोधत होता. पण अज्ञात हल्लेखोरांनी गोळी झाडून त्याची हत्या केली. मुलाच्या मृत्यूचे वृत्त ऐकून कोलमडून गेलेल्या वडिलांनी सरकारकडे त्याचे पार्थिव लवकरात लवकर मायदेशी आणण्याची विनंती केली.
रिपब्लिकन नेते डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून दुसऱ्या कार्यकाळासाठी शपथ घेतलेली असताना ही घटना समोर आली आहे. गत चार महिन्यांतील भारतीय युवकाच्या हत्येचे हे दुसरे प्रकरण आहे.