Saturday, October 4, 2025
Homeक्राईमअनुराग स्टेट बँक कॉलनीत दोन फ्लॅटमध्ये चोरट्यांनी ६ लाख ३७ हजारांचा...

अनुराग स्टेट बँक कॉलनीत दोन फ्लॅटमध्ये चोरट्यांनी ६ लाख ३७ हजारांचा ऐवज लांबविला

अनुराग स्टेट बँक कॉलनीत दोन फ्लॅटमध्ये चोरट्यांनी  ६ लाख ३७ हजारांचा ऐवज लांबविला

जळगाव : अनुराग स्टेट बँक कॉलनीतील ब्रीज हाईट्स अपार्टमेंटमधील दोन बंद फ्लॅटचे सेंट्रल लॉक तोडून चोरट्यांनी तब्बल ६ लाख ३७ हजारांचा ऐवज लंपास केला. तिसऱ्या मजल्यावर दिनेश गोडंबे यांच्या घरातून २ लाख ४४ हजारांचे दागिने, तर चौथ्या मजल्यावर दीपक परदेशी यांच्या घरातून ३ लाख ९३ हजारांचे सोनं, चांदी व रोकड चोरून नेण्यात आली.१९ सप्टेंबर रोजी परदेशी कुटुंब सुरतवरून परतल्यावर ही घटना उघडकीस आली. घटनेनंतर रामानंद नगर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, अनुराग स्टेट बँक कॉलोनीतील ब्रीज हाईट्स अपार्टमेंटमध्ये चौथ्या मजल्यावर दीपक प्रकाश परदेशी हे कुटुंबासह राहतात, तर तिसऱ्या मजल्यावर त्यांच्या ओळखीचे दिनेश बाबुराव गोडंबे हे कुटुंबासह राहतात. दि. ७ सप्टेंबरला परदेशी हे पत्नी व बहिणीसह सुरत येथे नातेवाईकांना भेटण्यासाठी गेले होते. त्यामुळे त्यांनी घरातील बेडरूमचे सेंट्रल लॉक आणि मुख्य दरवाजाचे सेंट्रल लॉक व कडीकोयंडा लावले होते. दुसरीकडे, गोडंबे हे दि. १० सप्टेंबरपासून पत्नी व बहिणीसह फत्तेपूर येथे गेले होते, ज्यामुळे दोन्ही फ्लॅट्स बंद होत्या.

दि. १९ सप्टेंबरला दुपारी १ वाजेच्या सुमारास परदेशी हे घरी परतले असता, मुख्य दरवाजाचे सेंट्रल लॉक व कडीकोयंडा तुटलेले दिसले. शंका येताच त्यांनी आजूबाजूच्या रहिवाशांना सांगितले आणि गोडंबे यांना बोलविण्यासाठी तिसऱ्या मजल्यावर गेले. तेथे गोडंबे यांच्या दरवाजाचे सेंट्रल लॉकही तुटून खाली पडलेले आढळले. परदेशी यांनी गोडंबे यांना फोन करून घटनेची माहिती दिली, ज्यात गोडंबे यांनी सांगितले की ते फत्तेपूरला आहेत. परदेशी यांनी त्यांना तात्काळ घरी येण्याचा सल्ला दिला.

दोघांनीही घटनेची माहिती रामानंद नगर पोलिसांना दिली. काही वेळात गोडंबे हेही घरी पोहोचले. पोलिसांसह घरात पाहणी केली असता, दोन्ही घरे अस्ताव्यस्त आढळली. परदेशी यांच्या घरातील बेडरूमचे सेंट्रल लॉक तोडून लाकडी कपाटातील ड्रॉवरमधून चोरट्यांनी २१.५ ग्रॅमच्या चार सोन्याच्या अंगठ्या, ५५ ग्रॅमची मंगलसूत्र, ३० ग्रॅमचा नेकलेस, २५ ग्रॅमचे मंगळसूत्र, २८.५ ग्रॅमच्या दोन चेन, ८ ग्रॅमचे कानातले, ८ ग्रॅमचे टॉंगल, ३ ग्रॅमचे कानातले, १ ग्रॅमचे पेंडल, १६ ग्रॅमची गहूळसूत्र, १० ग्रॅमची सोन्याची चिप, १३ ग्रॅमची लहान माळ, अर्धा ग्रॅमची बाल्या, ९० ग्रॅमचे चांदीचे चेन, ७० ग्रॅमचे ब्रेसलेट, १५ ग्रॅमच्या अंगठ्या, १५० ग्रॅमच्या साखळ्या, ५० ग्रॅमचे जोडवे, १०० ग्रॅमचे साकळ्या यासह ४० हजारांची रोकड नेली .

तसेच, गोडंबे यांच्या घरातील बेडरूम कपाटातील ड्रॉवरमधून ७५ ग्रॅमची मंगलसूत्र, ५० ग्रॅमच्या सोन्याच्या बांगड्या, २० ग्रॅमच्या लहान माळ व १८ ग्रॅमचे सोन्याचे कानातले असा २ लाख ४४ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरला गेला. घटनास्थळी रामानंद नगर पोलिसांसह श्वान पथक आणि फॉरेन्सिक पथक दाखल झाले. त्यांनी फिंगरप्रिंट्ससह पुरावे गोळा केले. अपार्टमेंट आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.

ताज्या बातम्या