Wednesday, April 15, 2026
Homeक्राईममुक्ताईनगर तालुक्यात पावणेदोन कोटी रुपयांचा गुटखा घेऊन जाणारा ट्रक पकडला

मुक्ताईनगर तालुक्यात पावणेदोन कोटी रुपयांचा गुटखा घेऊन जाणारा ट्रक पकडला

तीन जण ताब्यात; एलसीबीची कारवाई

मुक्ताईनगर :-दिल्लीवरून मध्यप्रदेश मार्गे महाराष्ट्रातून मुक्ताईनगर पासून मुंबई वसई येथे जाणारा गुटक्याने भरलेला ट्रक स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडला असून एक कोटी 78 लाख 66 हजार 80 रुपये किमतीचा राज्यात बंदी असलेला गुटखा 1 डिसेंबर रोजी पकडण्यात आला. तसेच तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की महाराष्ट्र राज्यात बंदी असलेल्या प्रतिबंधित गुटखा हा ट्रक क्रमांक (एन एल ०१ ए जे 17 25) हा दिल्लीहून मध्य प्रदेश व महाराष्ट्रातून मुक्ताईनगर मार्गे येऊन मुंबई येथील वसई येथे जात असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे रवींद्र पाटील दीपक माळी यांना मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी खात्री करून यावर कारवाई करण्याचे आदेश दिले.

त्यानुसार 1 डिसेंबर रोजी पुर्णाड फाटा येथे सदर ट्रक थांबवून तो तपासला असता त्यामध्ये एक कोटी 78 लाख 66 हजार 80 रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा मिळून आला. गुटखा व माल ट्रक व इतर मुद्देमाल असा एकूण दोन कोटी आठ लाख 82 हजार 580 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला असून तीन जणांना अटक करण्यात आली आहे.

तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

गुटख्याची वाहतुक करणाऱ्याट्रक चालक साकारउल्ला अब्दुल अजीज (वय ३०, रा. इमाम नगर, हरयाणा) व कैफ फारुख खान (वय १९, रा, ढळायत, राजस्थान), तारीफ लूकमान खान (वय २३, रा. इमाम नगर, हरयाणा) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, स्थानिक गुन्हे शाखेचे  शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, दीपक माळी, रवींद्र पाटील, मुरलीधर धनगर, सचिन पोळ आदींनी केली. दरम्यान इतक्या मोठ्या प्रमाणात गुटखा पकडल्याची कारवाई प्रथमच झाले असल्याचे बोलले जात आहे.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या