Tuesday, April 14, 2026
Homeक्राईमभारतात बनावट आधार कार्डद्वारे प्रवेश करणाऱ्या दोन बांगलादेशी महिलांना अटक

भारतात बनावट आधार कार्डद्वारे प्रवेश करणाऱ्या दोन बांगलादेशी महिलांना अटक

भारतात बनावट आधार कार्डद्वारे प्रवेश करणाऱ्या दोन बांगलादेशी महिलांना अटक 

भुसावळ बाजारपेठ पोलिसांची कारवाई

भुसावळ, प्रतिनिधीl भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी बांगलादेशी घुसखोरीचा पर्दाफाश करत दोन महिलांना बनावट आधार कार्डसह ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी त्या दोघींसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तानिया अहमद (वय २६) आणि करीमा अख्तर (वय २२) या दोन बांगलादेशी महिलांनी रेल्वेमार्गे बेकायदा भारतात प्रवेश केला.भुसावळ रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर त्या जामनेर रोडवरील ‘हॉटेल अतिथी’ येथे थांबल्या होत्या. हॉटेल व्यवस्थापनाने ओळखपत्र मागितले असता, त्यांनी आधार कार्डच्या प्रती सादर केल्या, परंतु मूळ कागदपत्रे दाखवण्यास असमर्थ ठरल्या. यामुळे संशय बळावल्याने हॉटेल प्रशासनाने पोलिसांना कळवले.पोलिसांनी तपास सुरू केला असता, महिलांनी मुंबईत एका ‘दीदी’कडे कामासाठी जात असल्याचे सांगितले. पुढील तपासात जलाल आणि सैफुल या दोघांनी बनावट आधार कार्ड तयार करून दिल्याचे समोर आले. पोलिसांनी तानिया, करीमा आणि संबंधित दोघांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू आहे.या प्रकरणाचा सखोल तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ आणि सहायक पोलीस निरीक्षक सोपान पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या