भडगाव येथे जखमी मादी वानराचा मृत्यू ; बजरंग दल कार्यकर्त्यांनी केला विधीवत अंत्यसंस्कार
भडगाव- प्रतिनिधी
भडगाव शहरातील ग्रीन पार्क कॉलनीमध्ये जखमी अवस्थेमध्ये मादी वानर हे त्याच्या एका पिल्लू सह फिरत होते.वानराच्या पायाला मोठी जखम झाल्याने ते गंभिर जखमी असल्याने आज दुपारी ते मृत अवस्थेत आढळले. यावेळी ग्रीन पार्क कॉलनी येथील सामाजिक कार्यकर्ते सोनू मुनाफ खाटीक यांनी ही घटना बजरंग दल कार्यकर्ते यांना दिली. यावेळी घटनास्थळी जाऊन बजरंग दल कार्यकर्त्यांनी मादी वानराला भडगाव स्मशानभूमी मध्ये नेऊन त्या ठिकाणी विधीवत अंत्यसंस्कार करण्यात आले. वानराचे पिल्लू हे सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले आहे. याबाबत वनविभागाला माहिती देण्यात आली आहे. यावेळी भडगाव शहरातील बजरंग दलाचे कार्यकर्ते गणेश वाघ, मानस पाटील,सोनू पाटील, अनिल अहिरे,संदेश राजपूत, अजय राजपूत,शांताराम पाटील आदी उपस्थित होते.u