Thursday, April 16, 2026
Homeखानदेशबिग ब्रेकिंग : बोगीमध्ये आग लागल्याच्या अफवेने प्रवाशांनी मारल्या उड्या

बिग ब्रेकिंग : बोगीमध्ये आग लागल्याच्या अफवेने प्रवाशांनी मारल्या उड्या

बिग ब्रेकिंग : बोगीमध्ये आग लागल्याच्या अफवेने प्रवाशांनी मारल्या उड्या

दुसऱ्या बाजूने येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसने अनेक प्रवाशांना चिरडले !

परधाडे रेल्वे स्थानकाजवळील घटना

जळगाव प्रतिनिधी

जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत असून पुष्पक एक्सप्रेसच्या बोगीला आग  लागल्याची अफवा पसरल्याने घाबरलेल्या प्रवाशांनी रेल्वेतून उड्या घेतल्या. मात्र दुसऱ्या बाजूने येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेस खाली आल्याने अनेक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली असून मृतांचा आकडा नेमका किती आहे हे समजू शकलेले नाही. दरम्यान रेल्वे प्रशासनाने मदत कार्य सुरू केले असून याअपघातामध्ये किती प्रवाशांना हे आकडेवारी रात्री उशिरापर्यंत समजणार आहे.

पुष्पक एक्स्प्रेस मुंबईकडे जात असताना, ट्रेनच्या ब्रेकमुळे चाकांमधून ठिणग्या उडाल्या. ठिणग्या पाहून काही प्रवाशांनी आग लागल्याचा संशय व्यक्त केला, ज्यामुळे अफवा पसरली की ट्रेनला आग लागली आहे. त्यामुळे सुमारे 30-35 प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून उड्या मारल्या. त्याचवेळी समोरून येणाऱ्या बंगळुरू एक्स्प्रेसने हॉर्न न वाजवता या प्रवाशांना चिरडले.

या भीषण अपघातात 6-7 जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे, तर अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र मृतांचा अधिकृत आकडा अद्याप स्पष्ट झालेला नाही.

 

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या