Friday, June 13, 2025
Homeजळगाव जिल्हाफूट बोर्डावर लटकलेल्या दोन लोकलमधील प्रवाशांच्या बॅगा घासल्याने झालेल्या अपघातात पाच जणांचा...

फूट बोर्डावर लटकलेल्या दोन लोकलमधील प्रवाशांच्या बॅगा घासल्याने झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू 

फूट बोर्डावर लटकलेल्या दोन लोकलमधील प्रवाशांच्या बॅगा घासल्याने झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू 

पुष्पक एक्स्प्रेसचा संबंध नाही ;  रेल्वे प्रशासनाचा खुलासा

मुंबई l प्रतिनिधी लोकलमधून प्रवासी फूटओव्हरवरुन प्रवास करत होते. एका ट्रॅकवरुन सीएसएमटीकडे लोकल जात होती. तर दुसऱ्या ट्रॅकवरुन कसाराच्या दिशेने लोकल जात होती. तसेच या दोघी  रेल्वे रुळांमधील अंतर कमी असल्यामुळे यावेळी दोन्ही लोकलमधील दरवाजावरील लटकलेल्या प्रवाशांची बॅग एकमेकांना घासली गेली. त्यामुळे प्रवासी एकमेकांना धडकल्याने तोल जाऊन आठ प्रवासी खाली पडून यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सकाळी 9.30 वाजता  मुंब्रा आणि दिवा स्थानकांच्या दरम्यान  घडली .

दरम्यान या अपघातात जीआरपी पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. विकी मुख्यादल असं त्यांचं नाव आहे. विकी ठाणे जीआरपी पोलिसात काम करीत होते. ते नेमक्या कोणत्या लोकलमध्ये होते याची माहिती कळू शकली नाही.

सुरुवातीला ही घटना पुष्पक एक्स्प्रेसशी संबंधित असल्याची चर्चा होती. मात्र, मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी हे वृत्त फेटाळून लावत, दोन्ही गाड्या स्थानिक लोकल ट्रेन्स असल्याचे स्पष्ट केले आहे.

नीला यांनी सांगितले की, “काही प्रवासी दरवाजाच्या फूट बोर्डवर होते. मुंब्रा आणि दिवा स्थानकांत कमी अंतर असल्याने दोन्ही लोकल एकमेकांच्या खूप जवळ आल्या आणि या वेळी प्रवासी एकमेकांना धडकून खाली पडले. ही घटना सकाळी ९.३० च्या सुमारास घडली. ९.५० वाजता अॅम्बुलन्स घटनास्थळी दाखल झाली आणि सर्व जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले.”

यामध्ये कसारा हून येणारी लोकल आणि सीएसटीच्या दिशेने जाणारी लोकल समाविष्ट होती. मध्य रेल्वेच्या इतिहासात दोन लोकल ट्रेनमध्ये प्रवासी असे एकमेकांना लागून पडल्याची ही पहिलीच घटना असल्याचे नीला यांनी नमूद केले.

यापुढे अशा घटना टाळण्यासाठी नवीन लोकल गाड्यांमध्ये ऑटोमॅटिक डोअर क्लोजर बसवले जाणार असून, जुन्या आयसीएफ लोकल गाड्यांनाही रेट्रो फिटमेंटद्वारे दरवाजे बंद ठेवण्याची यंत्रणा बसवण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

ताज्या बातम्या