Thursday, April 16, 2026
HomeBlogप्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिन उत्साहात

प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिन उत्साहात

प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिन उत्साहात
सावदा — अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदीर प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिन सोहळा सावदयाच्या डॉ. उल्हास पाटील सीबीएसई स्कुलमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला.


आपल्या देशात अध्यात्मिक, सांस्कृतिक, धार्मिक अशा विविध परंपरा साजरा केल्या जातात आणि म्हणूनच हा देश महान आहे. अयोध्या येथे प्रभु श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळयास दि २२ रोजी एक वर्ष पुर्ण झाले याचपार्श्वभुमीवर सावदयाच्या डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल येथे वर्धापन दिनानिमीत्त पूजा व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

शाळेच्या प्रिन्सीपल भारती महाजन यांच्या हस्ते प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शिक्षिका दिपाली धांडे यांनी प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे महत्त्व विषद केले. प्रभू राम स्तुती आणि इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी व संस्कृत शिक्षिका वर्षा नेहते सर्वांनी राम रक्षा स्तोत्राचे वाचन केले.

उद्देश एकच की विद्यार्थ्यांमध्ये अध्यात्मिक मूल्य रुजले जावे. प्रिन्सीपल भारती महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले. अध्यात्मिक वातावरणात हा कार्यक्रम संपन्न करण्यात आला.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या