Thursday, June 12, 2025
Homeक्राईमपोलिस असल्याचे भासवून नागरिकाची फसवणूक; सोन्याची चेन व अंगठी लंपास

पोलिस असल्याचे भासवून नागरिकाची फसवणूक; सोन्याची चेन व अंगठी लंपास

पोलिस असल्याचे भासवून नागरिकाची फसवणूक; सोन्याची चेन व अंगठी लंपास

जळगाव, पोलिस असल्याचे सांगून दुचाकीवरून आलेल्या दोन भामट्यांनी एका नागरिकाची सोन्याची चेन व अंगठी अशा दागिन्यांची फसवणूक केली. ही घटना सोमवारी बजरंग बोगद्याजवळील पेट्रोल पंप परिसरात घडली. संजय भगीरथ सोमाणी (वय ५९, रा. सोमाणी गल्ली, पिंप्राळा) यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संजय सोमाणी हे दुचाकीने घरी जात असताना पोलिस गणवेश परिधान केलेल्या दोघांनी त्यांना अडवले. वाहन परवाना विचारल्यावर सोमाणी यांनी तो दाखविला. त्यानंतर भामट्यांपैकी एकाने पंजाब व उत्तर प्रदेशातून काही गुन्हेगार आले असून, त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी दागिने तपासणीसाठी काढून ठेवण्याचे आदेश दिल्याचे सांगितले.

त्यांनी सोमाणी यांच्याकडील सोन्याची चेन व अंगठी रुमालात गुंडाळून ठेवण्यास सांगितले. सोमाणी यांनी तसे केले आणि रुमाल खिशात ठेवून पुढे गेले. मात्र काही वेळाने रुमाल उघडून पाहिल्यावर त्यात दोन दगड आढळले.

या फसवणुकीची तक्रार सोमाणी यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात दिली असून, पोलिसांनी अज्ञात दोघांविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

ताज्या बातम्या