Sunday, June 15, 2025
Homeक्राईमनशिराबादमध्ये अवैध गॅस रिफिलिंगचा पर्दाफाश! पोलिसांची धडक कारवाई; मोठा साठा जप्त

नशिराबादमध्ये अवैध गॅस रिफिलिंगचा पर्दाफाश! पोलिसांची धडक कारवाई; मोठा साठा जप्त

नशिराबादमध्ये अवैध गॅस रिफिलिंगचा पर्दाफाश! पोलिसांची धडक कारवाई; मोठा साठा जप्त

३.९६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

जळगाव (प्रतिनिधी) : नशिराबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैधरित्या घरगुती गॅस सिलेंडरमधून ऑटो रिक्षामध्ये गॅस भरला जात असल्याची माहिती मिळताच, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धडक कारवाई करत मोठा गॅस साठा जप्त केला.

गुरुवारी (७ मार्च २०२५) रात्रगस्ती दरम्यान पोलिसांना ही बाब निदर्शनास आल्यानंतर तात्काळ कारवाई करण्यात आली. संशयित आफताब आलम शेख रहीम (वय २८, रा. रहमतपुर, नशिराबाद) याला ताब्यात घेण्यात आले असून, ३.९६ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

रात्रगस्ती दरम्यान, नशिराबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका इसमाला घरगुती गॅस सिलेंडरमधून ऑटो रिक्षामध्ये गॅस भरताना आढळून आले. पोलिसांना पाहताच रिक्षाचालकाने अंधाराचा फायदा घेत पळ काढला.

त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी शोधमोहीम राबवत आफताब आलम शेख रहीम याला ताब्यात घेतले. तपासणीदरम्यान, टाटा Ase कंपनीची मालवाहतूक गाडी, १३ भरलेले गॅस सिलेंडर, ४ रिकामे सिलेंडर, १ अर्धे भरलेले सिलेंडर आणि गॅस भरण्याचे साहित्य असा ३,९६,१५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

भारतीय न्याय संहिता आणि EC Act अंतर्गत गुन्हा दाखल

सदर प्रकरणी गु.र.क्र. ३७/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २८७, २८८, २२३ तसेच अत्यावश्यक सेवा वस्तू अधिनियम ०३ व ०७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक शरद बागल यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली असून, त्यात पोलीस हवालदार कमलाकर बागुल, गजानन देशमुख, गोपाळ गव्हाळे, संघपाल तायडे आणि पोलीस कॉन्स्टेबल सचिन पोळ यांनी सक्रिय सहभाग घेतला.पुढील तपास नशिराबाद पोलिस ठाणे करीत आहे.

नागरिकांनी अवैध गॅस विक्री किंवा रिफिलिंगबाबत तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

ताज्या बातम्या