Friday, June 13, 2025
Homeजळगाव जिल्हाडॉ. संजय चव्हाण यांची मॅग्मोच्या राज्य सहसचिवपदी निवड

डॉ. संजय चव्हाण यांची मॅग्मोच्या राज्य सहसचिवपदी निवड

डॉ. संजय चव्हाण यांची मॅग्मोच्या राज्य सहसचिवपदी निवड

जळगावl प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य वैद्यकीय अधिकारी गट अ (मॅग्मो) संघटनेच्या राज्य सहसचिव पदी डॉ.संजय चव्हाण तालुका आरोग्य अधिकारी धरणगाव यांची निवड करण्यात आली. मॅग्मो ही शासनमान्य संघटना असून सार्वजनिक आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी कार्यरत असते. संघटनेच्या मुंबई येथे झालेल्या बैठकीत डॉ.संजय चव्हाण यांना निवडीचे पत्र मॅग्मोचे राज्याध्यक्ष डॉ. राहुल कन्नमवार, राज्य सरचिटणीस डॉ. संतोष हिंडोळे, मुख्य समन्व्यक डॉ. निलेश टापरे, कोषाध्यक्ष डॉ. राजेंद्र पवार, यांच्या उपस्थितीत देण्यात आले. डॉ संजय चव्हाण हे जळगाव जिल्ह्यात धरणगाव तालुका आरोग्य अधिकारी पदावर कार्यरत असून त्यांनी यापूर्वी संघटनेच्या जिल्हा आणि विभाग स्तरावर वैद्यकीय अधिकारी यांच्या न्याय हक्कासाठी संघटनात्मक काम केले आहे. डॉ चव्हाण यांनी यापूर्वी जिल्हा आरोग्य अधिकारी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा क्षयरोग अधिकारी, जिल्हा हिवताप अधिकारी अश्या विविध पदांचा अतिरिक्त पदभार सांभाळलेला असून त्यांना असलेल्या प्रदीर्घ सेवेच्या अनुभव पहता संघटनेने त्यांच्यावर राज्य सहसचिव पदाची जबाबदारी सोपविलेली आहे. मग्मो संघटनेच्या जिल्हा कार्यकारणी कडुन त्यांचा सत्कार करण्यात आला, तसेच कस्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या वतीने देखील अभिनंदन व सत्कार करण्यात आला.

 

 

ताज्या बातम्या