Friday, June 20, 2025
Homeक्राईमट्रकच्या धडकेत महिला जागीच ठार ; जळगावातील शिवाजीनगर उड्डाण पुलावरील घटना

ट्रकच्या धडकेत महिला जागीच ठार ; जळगावातील शिवाजीनगर उड्डाण पुलावरील घटना

शहरातील शिवाजीनगर उड्डाण पुलावरील घटना

जळगाव : शहर व तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून अपघातामध्ये चार जणांचा बळी गेल्याची घटना ताजी असताना आज पुन्हा सकाळी सव्वा दहा वाजेच्या सुमारास शिवाजीनगर उड्डाणपूल वर ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात पाचोरा तालुक्यातील राणीचे बांबरुड येथील रहिवासी असलेली महिला जागीच ठार झाल्याची घटना घडली.

वंदना अशोक गोराडे वय 55 असे मयत महिलेचे नाव आहे.

सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, पाचोरा तालुक्यातील राणीचे बांबरुड येथील रहिवासी असलेले अशोक सुकदेव गोराडे वय-६० हे पत्नी वंदना वय-५५ यांच्यासोबत शालकाच्या मुलाच्या साखरपुड्यासाठी चांदसर कामतवाडी गावी असताना दुचाकी क्रमांक एमएच.१९.डीजे.४७९६ ने जात असताना छत्रपती शिवाजी महाराज उड्डाण पुलावर सकाळी १०.१५ च्या सुमारास ट्रक क्रमांक एमएच.२१.एबी.७४६६ ने दुचाकीला धडक दिली.

अपघातात वंदना गोराडे यांचा जागीच मृत्यू झाला तर अशोक गोराडे हे जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच टॉवर चौकात कर्तव्यावर असलेले वाहतूक शाखेचे कर्मचारी आणि शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक व कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. पोलिसांनी ट्रकसह चालकाला ताब्यात घेतले आहे. मयत वंदना यांना एक मुलगा आणि २ मुली असा परिवार आहे.

ताज्या बातम्या