जळगावच्या ज्वेलर्स दुकानातून दागिने लांबविणार्या दोन सराईत महिलांना अटक
शनिपेठ पोलिसांची कारवाई
जळगाव प्रतिनिधी
चोरीच्या गुन्ह्यात यावल न्यायालयात तारखेवर हजर राहून माघारी परतणाऱ्या दोन बुरखाधारी महिलांनी सराफाच्या दुकानात दुकानांमधून २० ग्रॅम सोन्याचे दागिने चोरुन नेल्याची घटना घडली होती, शनिपेठ पोलिसांनी नेत्रमप्रणातील सौसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने त्या महिलांचा माग काढीत त्यांच्या मालेगावातून मुसक्या आवळीत जेरबंद केल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. महेन्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली
शहरातील सराफ बाजार पेठेतील विश्वनाथ हनुमानदास अग्रवाल (वय ६९) यांच्या मोयल ज्वेलर्स दुकानातून दोन बुरखाधारी महिलांनी दि. २८ जानेवारी रोजी २० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले होते. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचे गांभीर्य राखत संशयित महिलांचा शोध घेतला जात होता, दरम्यान, ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्यामुळे पोलिसांनी दुकानासह पोलिस विभागाच्या ‘नेत्रम’ कॅमे-यांच्या मदतीने सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली.
यामध्ये संशयित महिला चोरी करून सुभाष चौक,फगाणेकर चौकातून पायी जात असल्याचे दिसून आले. हि कामगिरी शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक माजीद मंसूरी, उपनिरीक्षक योगेश ढिकले, पोहेका विजय सौरे, पोना किरण वानखेडे, निलेश घुगे, महिला पोकों काजल सोनवणे यांच्यासह नेत्रम विभागातील पोकों मुबारक देशमुख यांच्या पथकाने केली फोन बुरखाधारी महिलांना शनिपेठ पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांच्याकडून चोरलेले १ लाख ४५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले.
त्यांची चौकशी केल्यानंतर त्या महिलांविरुद्ध अनेक पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. त्यांच्यावर फैजपूर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल असून त्याची न्यायालयात केस सुरु असून त्या तारखेला आल्या होत्या. तेथून माघारी परतत असतांना त्यांनी चोरी केल्याचे सांगितले. त्यांच्याविरुद्ध आझादनगर पोलीस ठाणे मालेगाव, कोल्हापूरी गेट पो. स्टेशन अमरावती, साक्री पो. ठाणे धुळे, चिखली पो. ठाणे बुलढाणा व शेगाव रेल्वे पोलीस ठाणे बुलढाणा याठिकाणी देखील चोरीचे गुन्हे दाखल आहेत