Friday, June 13, 2025
Homeक्राईमचाळीसगाव खंडणी प्रकरणी पोलिस अधीक्षक डॉ. रेड्डी यांची कारवाई; निरीक्षकाची नियंत्रण कक्षात...

चाळीसगाव खंडणी प्रकरणी पोलिस अधीक्षक डॉ. रेड्डी यांची कारवाई; निरीक्षकाची नियंत्रण कक्षात बदली तर एक पोलीस कर्मचारी निलंबित 

जळगाव  | २१ मे २०२५

चाळीसगाव शहरातील एका टायपिंग इन्स्टिट्यूटच्या मालकाकडून तीन लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी तात्काळ कारवाई करत चाळीसगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक किरणकुमार कबाडी यांची बदली नियंत्रण कक्षात केली असून, आरोपी पोलीस कर्मचारी अजय पाटील याला निलंबित करण्यात आले आहे.

टायपिंग क्लास चालवणारे स्वप्निल राखुंडे यांना एका पोलीस कर्मचाऱ्याने एका अल्पवयीन मुलीच्या प्रकरणात पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली आणि गुन्हा टाळण्यासाठी तीन लाख रुपयांची खंडणी मागितली. राखुंडे यांनी एकूण 1.20 लाख रुपये दिल्यानंतर मित्रांच्या सल्ल्याने त्यांनी तक्रार दाखल केली.

तक्रारीनंतर आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह नागरिकांनी पोलीस ठाण्यात ठिय्या दिला. त्यानंतर पोलिस अधीक्षकांनी त्वरित कारवाई करत निरीक्षक आणि संबंधित कर्मचाऱ्यांवर कठोर निर्णय घेतला. उकळलेले 1.20 लाख रुपये देखील जप्त करण्यात आले आहेत.

या प्रकरणी आमदार मंगेश चव्हाण यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, “पोलीस जरच नागरिकांकडून खंडणी उकळत असतील, तर हे सहन केले जाणार नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी IPS दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून व्हावी, अशी मागणी मी मुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालकांकडे करणार आहे.”

ताज्या बातम्या