Wednesday, November 19, 2025
Homeक्राईमकुर्नूलमध्ये भीषण बस अपघात; आगीत २० प्रवाशांचा मृत्यू, १२ जण थोडक्यात बचावले

कुर्नूलमध्ये भीषण बस अपघात; आगीत २० प्रवाशांचा मृत्यू, १२ जण थोडक्यात बचावले

कुर्नूलमध्ये भीषण बस अपघात; आगीत २० प्रवाशांचा मृत्यू, १२ जण थोडक्यात बचावले
कुर्नूल | वृत्तसस्था
आंध्र प्रदेशातील कुर्नूल जिल्ह्यात शुक्रवारी पहाटे बंगळुरू-हैदराबाद महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात खासगी प्रवासी बसला आग लागल्याने २० प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. या दुर्घटनेत १२ प्रवासी खिडक्या फोडून बाहेर पडल्याने सुदैवाने बचावले. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

https://www.instagram.com/reel/DQLH-HHj-Bq/?igsh=MWN0dGU4cXNjYnB1Mg==

प्राप्त माहितीनुसार, कावेरी ट्रॅव्हल्सची ही बस हैदराबादहून बंगळुरूकडे निघाली होती. चिन्ना टेक्कुर गावाजवळ बसने दुचाकीला धडक दिली आणि काही क्षणांतच बसमध्ये स्फोट होऊन आग भडकली. आग इतक्या वेगाने पसरली की, अनेक प्रवाशांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही.
या दुर्घटनेत २० प्रवाशांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली असून, जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिस आणि अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
पोलिसांनी अपघाताच्या कारणांचा तपास सुरू केला असून, मृतांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेने स्थानिकांमध्ये भीती आणि शोकाचे वातावरण निर्माण झाले आहे.

ताज्या बातम्या