Wednesday, July 30, 2025
Homeक्राईमअहमदाबाद विमान अपघातात सर्व २४२ प्रवाशांचा मृत्यू; मृतदेहांची ओळख पटविण्यासाठी DNA चाचणीचा...

अहमदाबाद विमान अपघातात सर्व २४२ प्रवाशांचा मृत्यू; मृतदेहांची ओळख पटविण्यासाठी DNA चाचणीचा आधार

अहमदाबाद विमान अपघातात सर्व २४२ प्रवाशांचा मृत्यू; मृतदेहांची ओळख पटविण्यासाठी DNA चाचणीचा आधार

अहमदाबाद (प्रतिनिधी) – अहमदाबादहून लंडनच्या गॅटविक विमानतळाकडे निघालेल्या एअर इंडियाच्या AI-171 या बोईंग 787-8 ड्रीमलायनर विमानाचा भीषण अपघात गुरुवारी दुपारी उड्डाणानंतर अवघ्या पाच मिनिटांत झाला. टेक ऑफ केल्यानंतर विमान थेट अहमदाबादच्या मेघानी नगर परिसरात कोसळले. या दुर्घटनेत विमानातील सर्व २४२ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती होती, जी अखेर खरी ठरली आहे.

भीषण दुर्घटनेची झळ
एअर इंडियाच्या या विमानात २४२ प्रवासी आणि १२ क्रू सदस्य होते. यात १६९ भारतीय, ५३ ब्रिटिश, ७ पोर्तुगीज आणि १ कॅनडियन नागरिकांचा समावेश होता. विमानाचा अपघात इतका तीव्र होता की, कोसळल्यानंतर प्रचंड स्फोट झाला आणि आग भडकली. त्यामुळे मृतदेह इतके जळून गेले आहेत की अनेकांची ओळख पटविणे अशक्य झाले आहे. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, ओळख पटविण्यासाठी आता DNA चाचणीचा आधार घेतला जाणार आहे.

कुशल वैमानिक असूनही टळला नाही अपघात
या विमानाचे मुख्य वैमानिक कॅप्टन सुमीर सभरवाल यांना ८,२०० तासांचा विमान उड्डाणाचा अनुभव होता, तर फर्स्ट ऑफिसर क्लाइव कुंदर यांच्याकडे १,१०० तासांचा अनुभव होता. तरीही तांत्रिक बिघाड किंवा अन्य संभाव्य कारणांमुळे हा अपघात टळू शकला नाही.

अपघातस्थळी मदत कार्य सुरू
घटनेनंतर NDRF, BSF, अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासनाने युद्धपातळीवर मदतकार्य सुरू केले. घटनास्थळी ७ अग्निशमन गाड्या आणि बचाव पथक दाखल झाली. अनेक जखमींना अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

हेल्पलाइन सेवा आणि सहकार्य
या दुर्घटनेनंतर एअर इंडियाने प्रवाशांच्या नातेवाईकांसाठी 1800 5691 444 हा हॉटलाइन क्रमांक सुरू केला आहे. तसेच, DGCA आणि विमान अपघात तपास ब्युरोने (AAIB) या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. एअर इंडियाने आपल्या सोशल मीडियावरील सर्व प्रोफाइल फोटो हटवून शोक व्यक्त केला आहे आणि अधिकृत वेबसाईटवर सातत्याने अपडेट्स देण्यात येत आहेत.

शोकसंदेश आणि शासकीय प्रतिसाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेला “हृदयद्रावक” ठरवत शोक व्यक्त केला आहे. ब्रिटनचे पंतप्रधान कीअर स्टारमर, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन, तसेच भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही या दुर्घटनेबाबत तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

ताज्या बातम्या