Tuesday, April 14, 2026
Homeक्राईमअबब..पाचोऱ्यात तरुणाने १८ तलवारी विक्रीस आणल्या ; पाचोरा पोलिसांनी त्याच्या मुसक्याच आवळल्या...

अबब..पाचोऱ्यात तरुणाने १८ तलवारी विक्रीस आणल्या ; पाचोरा पोलिसांनी त्याच्या मुसक्याच आवळल्या !

अबब..पाचोऱ्यात तरुणाने १८ तलवारी विक्रीस आणल्या ; पाचोरा पोलिसांनी त्याच्या मुसक्याच आवळल्या !

पाचोरा (प्रतिनिधी) : पाचोरा शहरात अवैध शस्त्र विक्रीचा डाव पोलिसांनी उलथवून लावत माहिजी नाका परिसरात सापळा रचून पोलिसांनी एका तरुणाला रंगेहाथ पकडून त्याच्याकडून तब्बल १८ तलवारी जप्त केल्या. या कारवाईने शहरात खळबळ उडाली असून, जप्त तलवारीची किंमत अंदाजे ५४,००० रुपये आहे.

दिनांक १८ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास पाचोरा पोलिस ठाण्याचे निरीक्षक राहुलकुमार पवार यांना गुप्त माहिती मिळाली की, माहिजी नाका परिसरात एक इसम तलवारी विक्रीसाठी घेऊन आला आहे. तत्काळ पोलिसांनी सापळा रचून सोहेल शेख तय्युब शेख (वय २४, रा. स्मशानभूमी रोड, बाहेरपुरा, पाचोरा) याला ताब्यात घेतले. कसून चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून १८ तलवारी जप्त करण्यात आल्या, ज्या त्याने विक्रीसाठी लपवून ठेवल्या होत्या. याशिवाय, त्याने काही तलवारी आधीच विक्री केल्याचेही उघड झाले.

या प्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात गुन्हा रजि. क्रमांक ४६०/२०२५ नोंदवण्यात आला असून, आरोपीवर भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ४, २५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१)(३), १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही धडक कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक (चाळीसगाव परिमंडळ) सौ. कविता नेरकर, उपविभागीय पोलिस अधिकारी अरुण आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यात पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार, पोउपनिरीक्षक कृष्णा घायाळ, कैलास ठाकूर, पोकॉ संदीप राजपूत, जितेंद्र पाटील आणि हरीष परदेशी यांनी महत्त्वपूर्ण सहभाग नोंदवला. या यशस्वी कारवाईबद्दल पोलिस पथकाचे वरिष्ठांनी कौतुक केले आहे.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या