होळी निमित्त मध्य रेल्वेची प्रवाशांसाठी मोठी सुविधा; ४८ विशेष गाड्या धावणार
भुसावळ प्रतिनिधी
होळी सणानिमित्त प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता, मध्य रेल्वेने ४८ अतिरिक्त विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई, पुणे आणि अन्य महत्त्वाच्या स्थानकांवरून उत्तर भारत तसेच दक्षिण भारतातील विविध गंतव्यस्थानांसाठी या गाड्या धावणार आहेत. भुसावळ विभागातील प्रवाशांनाही या विशेष गाड्यांचा लाभ मिळणार आहे.
प्रमुख विशेष गाड्यांचे वेळापत्रक:
०९००९ लोकमान्य टिळक टर्मिनस – पानापूरविशेष गाडी ११, १६ आणि १८ मार्चला सुटणार.
०१०१० लोकमान्य टिळक टर्मिनस – समस्तीपूरविशेष ट्रेन १६ मार्चला दुपारी १२:१५ वाजता सुटणार.
०११२३ लोकमान्य टिळक टर्मिनस – मऊही द्वि-साप्ताहिक विशेष ट्रेन ९, १२, १६ आणि १८ मार्चला मऊ येथून सकाळी ५:५० वाजता सुटणार.
०१०५३ लोकमान्य टिळक टर्मिनस – बनारस द्वि-साप्ताहिक विशेष ट्रेन १२ व १३ मार्चला मुंबईहून सुटणार, तर परतीसाठी ०१०५४ बनारस – लोकमान्य टिळक टर्मिनस गाडी १२ व १४ मार्चला रात्री १०:३० वाजता सुटणार.
०१७८१ पुणे – दानापूर द्वि-साप्ताहिक विशेष गाडी १०, १४, १७ मार्चला पुणे येथून सायंकाळी ७:५५ वाजता सुटणार.
०१४८२ दानापूर – पुणेसाप्ताहिक विशेष ट्रेन १२, १६ व १९ मार्चला दानापूर येथून सकाळी ६:४५ वाजता सुटणार.
०१४३१ पुणे – गाजीपूर विशेष ट्रेन ७, ११, १४ आणि १८ मार्चला सकाळी ६:४० वाजता पुणे येथून सुटणार.
परतीसाठी ०१४३२ गाजीपूर – पुणे गाडी ९, १३, १६ आणि २० मार्चला पहाटे ४:२० वाजता सुटणार.०१०३३ लोकमान्य टिळक टर्मिनस – समस्तीपूर
साप्ताहिक विशेष ट्रेन ११ व १८ मार्चला दुपारी १२:१५ वाजता सुटणार.परतीसाठी ०१०४४ समस्तीपूर – लोकमान्य टिळक टर्मिनस गाडी १२ व १९ मार्चला रात्री ११:२० वाजता सुटणार आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता पोहोचेल.
मुख्य मार्ग आणि थांबे:
या विशेष गाड्या ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, जळगाव आणि भुसावळ मार्गे धावणार असून, उत्तर व दक्षिण भारतातील विविध स्थानकांपर्यंत जोडल्या जाणार आहेत.
प्रवाशांनी या गाड्यांचे आरक्षण लवकरात लवकर करून घ्यावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.