Friday, June 13, 2025
Homeक्राईमहॉस्पिटलमध्ये भागीदारी देण्याचे आमिष दाखवून व्यावसायिकाला वीस लाखांत गंडाविले !

हॉस्पिटलमध्ये भागीदारी देण्याचे आमिष दाखवून व्यावसायिकाला वीस लाखांत गंडाविले !

हॉस्पिटलमध्ये भागीदारी देण्याचे आमिष दाखवून व्यावसायिकाला वीस लाखांत गंडाविले !

एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

जळगाव, प्रतिनिधी 

शहरातील एका व्यावसायिकाला हॉस्पिटलमध्ये भागीदारीचे आमिष दाखवून तब्बल २०.७३ लाख रुपयांना गंडा घालण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. मोहसीन गुलाब पिंजारी (रा. प्लॉट नंबर ०१, सर्व्हे नंबर ३१९, हायवे नंबर ०६, संगम बेकरीजवळ, जळगाव) या आरोपीने हेल्थ प्लस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये भागीदार करण्याचे आश्वासन देत मोहम्मद शोएब शेख यांच्याकडून मोठी रक्कम उकळली आणि अखेर कुटुंबासह फरार झाला.

व्यावसायिकाला भागीदारीचे आमिष

फिर्यादी शोएब शेख (रा. शाहूनगर, जळगाव) आणि आरोपी मोहसीन पिंजारी यांची तीन वर्षांपासून ओळख होती. जून २०२४ मध्ये मोहसीनने हॉस्पिटल सुरू करण्यासाठी भागीदारीची संधी असल्याचे सांगून टप्प्याटप्प्याने मोठी रक्कम घेतली

सुरुवातीला ७ लाख रुपये मिळाल्यानंतर मोहसीनने मोठ्या मशिनरीसाठी आणखी १० लाख रुपयांची गरज असल्याचे सांगून, हरिश आफताब मिर्झा यांच्याकडून ७ लाख रुपये घेतले. त्यामुळे फिर्यादीने एकूण १४.७३ लाख रुपये दिल्याचा कबुलीजबाब नोंदवला आहे

याशिवाय, वसीम अख्तर जमील अख्तर यांच्याकडून देखील मोहसीन पिंजारीने ६ लाख रुपये घेतले. त्यामुळे एकूण फसवणुकीचा आकडा २०.७३ लाख रुपयांवर पोहोचला

सप्टेंबर २०२४ मध्ये पैसे परत मागितल्यावर मोहसीनने एक महिन्याचा अवधी मागितला. जानेवारी २०२५ मध्ये तो ६ जानेवारीला पैसे देण्याचे सांगून अचानक गायब झाला. घर आणि दुकान बंद असल्याचे दिसून आल्याने शेजाऱ्यांकडे चौकशी केली असता, तो संपूर्ण कुटुंबासह फरार झाल्याचे स्पष्ट झाले.

या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात भा.दं.वि. कलम ३१८(४) आणि ३१६(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक राहुल वसंत तायडे करत आहेत.

 

ताज्या बातम्या