Friday, June 20, 2025
Homeक्राईमसोने लुटणाऱ्या दोन आरोपींना अटक; २० ग्रॅम सोने जप्त

सोने लुटणाऱ्या दोन आरोपींना अटक; २० ग्रॅम सोने जप्त

सोने लुटणाऱ्या दोन आरोपींना अटक; २० ग्रॅम सोने जप्त

एलसीबीची कारवाई

जळगाव प्रतिनिधी ;– स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत सोन्याची लूट करणाऱ्या दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी २० ग्रॅम सोने जप्त केले असून, आरोपींना पुढील तपासासाठी रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

रामानंद नगर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेला महत्त्वाची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास करून दोन संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. अटक करण्यात आलेले आरोपी अबरार हमीद खाटीक (रा. उमर कॉलनी, जळगाव) आणि समीर शेख सलीम (रा. हुडको, पिंप्राळा, जळगाव) असे आहेत.

हि कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी ,अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते , डीवायएसपी संदीप गावित , वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे ,सपोनि राजेश मेढे, सपोनि रवी नरवाडे, सपोनि अतुल वंजारी, पोहेकॉ हरिलाल पाटील, विजय पाटील, प्रवीण भालेराव, महेश पाटील, सागर पाटील आदींच्या पथकाने हि कारवाई केली.

ताज्या बातम्या