शेरू मोती राणी यांच्यासाठी पाणी मोहीमेअंतर्गत
जलसा व्हेजतर्फे पशूप्रेमींना परळ व पाण्याचे हौद मोफत वाटप
जळगाव — शहरासह जिल्हयाचे तापमान दरवर्षी वाढतच जावून जवळपास ४६ अशांपर्यत पोहचल्याने माणसासह प्रत्येक जीव हैराण झाला आहे. म्हणूनच घराच्या अंगणात, गच्चीवर प्राणी-पक्ष्यांसाठी पाणी ठेवण्याचे आवाहन जलसा व्हेजतर्फे करण्यात येत आहे.यासाठी लागणारे परळ व पाण्याचे हौद मोफत देखिल देण्यात आले आहे.
गेल्या अनेक वर्षापासून जलसा व्हेजचे संचालक स्वता आकाशवणी जवळील आपल्या हॉटेलच्या बाहेर शेरू मोती आणि राणी यांच्यासाठी आहे पाणी असा बोर्ड व पाण्याचा हौद प्राण्यांसाठी तर माठ हा मानवांसाठी भरून तृष्णा भागवत असतात. अशातच ही मोहीम तिव्र करण्यासाठी गेल्या ५ वर्षापासून परळ व हौद वाटप सूरू केले आहे. ज्यांना परळ किंवा हौद हवे असतील त्यांना जरी ते मोफत दिले जातात.
त्याचा योग्य उपयोग होतो की नाही यासाठी ज्यांनी परळ किंवा हौद नेले त्यांना प्राणीमात्रासाठी उपयोग करीत असल्याचा पुरावा म्हणून फोटो मागवण्यात येवून मोहीम यशस्वी होत असल्याची माहिती देतांना संचालक जितेंद्रभाई कांकरीया यांनी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच सर्वच ठिकाणी तीव्र उष्णतेच्या झळा लागतील.उन्हाळ्यात ठराविक वेळेनंतर थंड पाणी पिऊन आपण स्वत:ला उन्हापासून वाचविण्याचा प्रयत्न करत असतो. असेच काहीसे प्राणी-पक्ष्यांचेही आहे. त्यांनाही पाण्याची आवश्यकता आहे.
पाण्याअभावी अनेक प्राणी-पक्ष्यांचा मृत्यू होतो. निसर्गाच्या साखळीमध्ये प्राणी-पक्ष्यांना देखील सर्वाधिक महत्त्व आहे. यासाठी एक जबाबदार नागरिक, सामाजिक भान, माणुसकी म्हणून आपण प्राणी-पक्ष्यांसाठी, त्यांची तहान भागवण्यासाठी, त्यांचा जीव वाचवण्यासाठी उन्हाळ्याच्या दिवसात तळमळीने प्रयत्न केले पाहिजे. घरी सावलीच्या ठिकाणी व पक्ष्यांना मुक्त वातावरण मिळेल अशा ठिकाणी मातीच्या पसरट भांड्यात पाणी ठेवावे. पक्ष्यांना आंघोळही करता येईल, असे भांडे असावे.- पाण्यासोबतच अन्नाची व्यवस्थाही करता येईल.
विशेषत: ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ आदी धान्याचा भरडा उत्तम ठरेल. यासह भाताचे शित व पोळ्यांचे बारीक तुकडे करून ठेवता येतील आणि म्हणूनच ही मोहीम आपण सूरू केल्याचे सांगीतले आहे. जवळपास ३५ च्या वर पाण्याचे छोटे हौद तर ५० ते १०० परळ त्यांनी वाटप केले आहे.अजूनही बहुतेक पशूप्रेमी येवून छोटे हौद त्यांच्याकडून विनामुल्य घेवून जात आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या मोहीमेत सहभाग घेण्याचे आवाहन संचालक जितेंद्रभाई कांकरीया यांनी केले आहे.