मुरुम वाहतूक करणाऱ्या डंपरने ‘त्या’ तीन मजुरांना चिरडले
तरुणाला अटक ;पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांची माहिती
जळगाव प्रतिनिधी
जळगाव खुर्द गावाजवळील महामार्गालगत असलेल्या सव्हींस रस्त्याच्या बांधकामाच्या ठिकाणी अज्ञात डंपरने झोपलेल्या तीन मजुरांना चिरडल्याची घटना मंगळवारी घडली होती. पोलिसांकडून दिवसभर चिरडणाऱ्या वाहन चालकाचा शोध घेतला जात होता. अखेर नशिराबाद पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजवरुन मुरुम वाहतुक करणाऱ्या प्रकाशकुमार सुदामाप्रसाद पटेल (वय २४, रा. उफरवली, पो. कदौर, तहसील सिहाबाद, जि. सिंधी, मध्यप्रदेश) याच्या मुसक्या आवळल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जळगाव खुर्द गावाजवळ सुरु असलेल्या उड्डाणपुलाशेजारी सव्हींस रस्त्याचे काम सुरु आहे. याठिकाणी परप्रांतीय मजूर काम करीत असून सोमवारी रात्री उशिरापर्यंत तेथील नाल्याचे बांधकाम सुरु होते. रात्री काम आटोपल्यानंतर काम करणारे मजूर त्याठिकाणी झोपलेले होते. दरम्यान, पहाटेच्या सुमारास एका अज्ञात वाहनाने गाढ झोपेत असलेल्या मजूरांना चिरडल्याची घटना घडली होती. ही घटना उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ माजून गेली होती. मजूरांना चिरडणारे वाहन नेमके कोणते होते याबाबत पोलिसांना कुठलीही माहिती नसाल्याने पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात होता.
सव्हींस रोडच्या पुढे रस्ताच नसल्याने, या ठिकाणी केवळ कामाच्या ठिकाणी माल आणणारे वाहनच येऊ शकते, असा अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला होता. त्यानुसार पोलिसांनी त्याठिकाणी मुरुम वाहतुक करणाऱ्या तिघ डंपरसह चालकांना
पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. परंतु सुरुवातीला चालकांनी आपण वाहन त्याठिकाणी नेले नसल्याचे सांगितले.
डंपर मागे घेत असताना झाला अपघात
मिळालेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी संबधित चालकांची कसून चौकशी केली असता, प्रकाश कुमार सुदामा प्रसाद पटेल या चालकाला ताब्यात घेतले. त्याने आपण मुरुम भरुन आणलेले डंपर घेवून त्याठिकाणी आलो होते. मात्र ते कुठल्या ठिकाणी खाली करायचे हे माहिती नसल्याने ते वाहन रिव्र्व्हस घेत असतांना झोपलेलेल्या मजूर आपल्या वाहनाखाली चिरडल्या गेल्याची त्याने कबुली दिली. त्यानंतर रात्री उशिरा नशिराबाद पोलिसांनी संबधित चालकाला अटक करण्यात आली असून त्याला दि. १५रोजी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.