Tuesday, April 21, 2026
Homeक्राईममहामार्गावर ३ फेब्रुवारीपासून हेल्मेट सक्ती : जागेवरच हजार रुपयांचा दंड

महामार्गावर ३ फेब्रुवारीपासून हेल्मेट सक्ती : जागेवरच हजार रुपयांचा दंड

महामार्गावर  ३ फेब्रुवारीपासून हेल्मेट सक्ती : जागेवरच हजार रुपयांचा दंड

जळगाव प्रतिनिधी
राष्ट्रीय महामार्गावर दुचाकी अपघातात मृत्यू रोखण्यासाठी सोमवार दि. ३ फेब्रुवारीपासून राष्ट्रीय महामार्गावर हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. दुचाकी चालक व मागे बसणारा अशा दोघांना ही सक्ती असून चार वर्षांवरील प्रत्येकाने महामार्गावर हेल्मेट परिधान करणे बंधनकारक राहणार आहे. हेल्मेट नसल्यास जागेवरच एक हजार रुपये दंड केला जाणार आहे.

शासनाने राष्ट्रीय महामार्गावर यंदा नवीन वर्षात दि. १ जानेवारी पासून हेल्मेट सक्ती करण्याविषयी आदेश काढण्यात आले.  मात्र आता महामार्गावर दुचाकी चालक व मागे बसणारा अशा दोघांनाही हेल्मेट सक्ती राहणार आहे. याचे उल्लंघन झाल्यास एक हजार रुपये केला जाणार आहे. यासाठी महामार्गावर ठिकठिकाणी चाहतूक पोलिस तैनात राहणार असून ते थेट दंडात्मक कारवाई करणार आहेत, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी दिली

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या