मनरेगाच्या कंत्राटी अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात पकडले!
धरणगाव येथे एसीबीची कारवाईने खळबळ
जळगाव (प्रतिनिधी) : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत गोठा शेड बांधकामाच्या कार्यारंभ आदेशासाठी लाच घेताना मनरेगाच्या दोन कंत्राटी अधिकाऱ्यांना अँटी करप्शन ब्युरोच्या (ACB) पथकाने रंगेहात पकडले. ही कारवाई धरणगाव पंचायत समिती अंतर्गत करण्यात आली असून, या घटनेमुळे शासकीय यंत्रणेमध्ये खळबळ उडाली आहे.
असे उघडकीस आले प्रकरण
तक्रारदार शेतकऱ्याने गोठा शेड बांधकामासाठी मंजुरी मिळवण्यासाठी प्रयत्न केले असता, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रविण चौधरी (वय 39) यांनी त्याच्याकडे 2000 रुपयांची लाच मागितली. तडजोडीनंतर 1500 रुपये स्वीकारले जात असतानाच ACB पथकाने ही कारवाई केली.
आरोपींची नावे :
1️⃣ प्रविण दीपक चौधरी (वय 39) – सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, मनरेगा, पंचायत समिती, धरणगाव
2️⃣ उमेश किशोर पाटील (वय 36) – तांत्रिक सहाय्यक, मनरेगा, पंचायत समिती, धरणगा
लाचेची रक्कम आणि कारवाई
▶️ मागणी – 2000/- रुपये
▶️ स्वीकारले – 1500/- रुपये
▶️ कारवाई दिनांक – 21 मार्च 2025
आरोपी क्रमांक 2 उमेश पाटील यांनी शेतात जाऊन GPS प्रणालीद्वारे फोटो काढण्यासाठी पेट्रोलसाठी पैशांची मागणी करत तक्रारदाराला लाच देण्यासाठी प्रोत्साहित केले. त्यामुळे ACB ने त्यांच्यावरही कारवाई केली.
धरणगाव पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. ही कारवाई ACB चे पोलीस उपअधीक्षक श् योगेश ठाकूर आणि पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
सर्व नागरिकांना आवाहन
कोणत्याही शासकीय कामासाठी लाच मागितल्यास अँटी करप्शन ब्युरो, जळगाव येथे तक्रार नोंदवा.
☎️ दूरध्वनी क्रमांक: 0257-2235477
📞 टोल फ्री क्रमांक: 1064