मनपाचा अर्थसंकल्प आज महासभेत सादर होणार
१२४७ कोटी १५ लाखांचे करवाढ नसलेले अंदाजपत्रक
जळगाव प्रतिनिधी
जळगाव महापालिकेचा १२४७ कोटी १५ लाख रुपयांचा करवाढ नसलेला अर्थसंकल्प आज (दि. ५ मार्च) महासभेत सादर होणार आहे. मनपाचे मुख्य लेखाधिकारी चंद्रकांत वानखेडे यांनी हे अंदाजपत्रक याआधी (दि. १४ फेब्रुवारी) स्थायी समितीच्या बैठकीत आयुक्तांना सादर केले होते.
या अंदाजपत्रकात १० कोटी १८ लाख रुपयांची अखेरची शिल्लक दर्शविण्यात आली आहे. प्रशासक कार्यकाळातील हे दुसरे अंदाजपत्रक असून, महासभेत त्याला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. शहराच्या विकास आराखड्यात कोणत्या योजनांना अधिक निधी मिळतो, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.