Friday, June 13, 2025
Homeखानदेशमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर शिवसेनेची नवी जबाबदारी

मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर शिवसेनेची नवी जबाबदारी

मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर शिवसेनेची नवी जबाबदारी
परभणी आणि बुलढाण्याचे संपर्क मंत्री म्हणून नियुक्ती

मुंबई/जळगाव प्रतिनिधी

शिवसेना पक्षाने संघटन विस्तार आणि पक्षबांधणी अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने वरिष्ठ नेत्यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत. याच अनुषंगाने, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची परभणी आणि बुलढाणा जिल्ह्यांचे संपर्क मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

गुलाबराव पाटील यांना यापूर्वीही या जिल्ह्यांसोबत काम करण्याचा अनुभव असल्यामुळे त्यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आली आहे. शिवसेना नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.

माझ्यावर ठेवलेल्या विश्वासाला पूर्णपणे न्याय देण्याचा मी प्रयत्न करीन,” असे मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या नव्या जबाबदारीबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले.

ताज्या बातम्या