प्राध्यापकाचा भन्नाट डान्स! कॉलेजच्या मंचावर थिरकताना पाहून विद्यार्थी थक्क
बंगळुरू (प्रतिनिधी) : सोशल मीडियावर सध्या एका कॉलेज प्राध्यापकाचा डान्स व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. विद्यार्थ्यांसमोर दिलखुलास नृत्य करणाऱ्या या प्राध्यापकाने असे काही भन्नाट डान्स स्टेप्स सादर केले आहेत की, पाहणाऱ्यांना क्षणभर “हे खरोखर शिक्षक आहेत का प्रोफेशनल डान्सर?” असा प्रश्न पडावा!
https://www.instagram.com/gatalbum?igsh=MW5pcWU4YXhoYTlrcA==
हा व्हायरल व्हिडीओ बंगळुरू येथील ग्लोबल अकादमी ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेजमधील असल्याचे समोर आले आहे. कॉलेजच्या एका कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी खचाखच भरलेल्या सभागृहात हा प्राध्यापक स्टेजवर चढतो आणि मायकल जॅक्सनच्या स्टाइलमध्ये अविश्वसनीय डान्स परफॉर्म करतो. त्याचे अचूक डान्स स्टेप्स आणि दमदार एक्सप्रेशन्स पाहून विद्यार्थी अक्षरशः जल्लोष करताना दिसत आहेत.
नृत्यातून जबरदस्त ऊर्जा!
व्हायरल व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसते की, हा शिक्षक जबरदस्त आत्मविश्वासाने डान्स करत आहे. त्याच्या उर्जेने तरुण विद्यार्थ्यांनाही लाजवेल असे वाटत आहे. त्याच्या प्रत्येक स्टेप अत्यंत सफाईदार आणि स्टायलिश असून, मायकल जॅक्सनच्या प्रसिद्ध डान्स मूव्ह्स त्याने अप्रतिमपणे सादर केल्या आहेत.
सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद
हा व्हिडीओ सोशल मीडियावर @gatalbum या अकाउंटवर पोस्ट करण्यात आला असून, त्याला लाखो व्ह्युज मिळाले आहेत. प्राध्यापकाच्या या दमदार डान्सचे नेटकऱ्यांनी भरभरून कौतुक केले आहे. अनेकांनी “असे शिक्षक प्रत्येक कॉलेजमध्ये असायला हवेत!” असे म्हणत त्याचा उत्साह वाखाणला आहे.
‘नाटू-नाटू’वरही घातली धमाल!
विशेष म्हणजे, याच प्राध्यापकाचा आणखी एक डान्स व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात तो तेलुगू चित्रपट ‘आरआरआर’मधील ‘नाटू-नाटू’ गाण्यावर एका पुरुषाबरोबर नाचताना दिसतो. हा व्हिडीओ पाहूनही लोकांनी त्याच्या नृत्यकौशल्याला दाद दिली आहे.